ताज्या घडामोडी

केज तालुक्यातील अनेक गावांसाठी “गेटेड कोल्हापूरी बंधाऱ्याच्या” सर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. नांदेड-हिंगोली च्या महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमाला मुंडे यांच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री महोदयांची सही! जलसंधारण खात्याला कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे तातडीचे आदेश!

पाठलाग न्युज/मुंबई:

केज तालुक्यातील अनेक गावांसाठी “गेटेड कोल्हापूरी बंधाऱ्याच्या” सर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. नांदेड-हिंगोली च्या महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमाला मुंडे यांच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री महोदयांची सही! लसंधारण खात्याला कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे तातडीचे आदेश!

 

मुंबई: केज तालुक्यातील अनेक गावातील लहान-मोठ्या नदी-नाल्या द्वारे भरमसाठ पाणी विसर्ग होऊन पाणी वाया जाते.ही वास्पतव परिस्थिती विचारात घेऊन, ठिकठिकाणी गेटेड कोल्हापूरी बंधारे बांधण्यात आले तर,शिवारातील वाया जाणारे पाणी शेतीसाठी उपयोगात आणले जाऊ शकते.या वास्तव परिस्थितीचा विचार करुन, नांदेड-हिगोंलीच्या महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमाला मुंडे यांनी विडा सर्कलमधील बहुतांश गावातील कोल्हापूरी.बंधार्याच्या साईडचे सर्वेक्षण करुन साईड्स मंजुरी बाबदचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समोर ठेवला होता. सदर प्रस्तावाचा विचार करुन मा.मुख्यमंत्री महोदयांनी प्रस्तुत प्रस्तावावर तात्काळ सही करून, सर्हेक्षणाची तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत

. मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आणि जलसंधारण व मृदसंधारण विभागाच्या प्रधान सचिवांच्या आदेशानुसार कोल्हापुरी बंधार्यांचे सर्वेक्षण व मंजुरीची कारवाई प्रदेशिक जलसंधारण व मृदसंधारण आधिकारी, छत्रपती संभाजीनगर, यांनी ताडीने कारवाई सुरू केली आहे. कोल्हापुरी गेटेड बंधारेंच्या सर्वेक्षण व अंदाजपत्रकांच्या कारवाई मध्ये दहिफळ(वडमावली),देवगाव, लिंबाचीवाडी,पिराचीवाडी,विडा,बेंगळवाडी,आंधळेवाडी,विडा नदीवरील सर्व वाड्या,या आणि परिसरातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला असून, प्रस्तुत प्रोजेक्ट कार्यान्वित झाला तर परिसरातील पण्याचा अपव्यं थांबून शेतीसाठी मुबलक पणी उपलब्ध होणार असल्याचे मत सर्वसामान्यातुन व्यक्त होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये