ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

केज मतदार संघाच्या विकासात्मक भविष्यासाठी नमिता ताई मुंदडाना निवडून द्या — नितीन गडकरी. तुतारीने आपला पराभव केला आता तुतारीचा पराभव करा आ. पंकजाताई मुंडे.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज मतदार संघाच्या विकासात्मक भविष्यासाठी नमिता ताई मुंदडाना निवडून द्या — नितीन गडकरी.

तुतारीने आपला पराभव केला आता तुतारीचा पराभव करा आ. पंकजाताई मुंडे.

अंबाजोगाई: केज विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांना विजयी करण्यासाठी येथील शंकर महाराज वंजारी वसतिगृह मैदानावर गडकरी- मुंडें ची विराट जाहिर सभा संपन्न झाली. प्रारंभी स्व. प्रमोदजी महाजन, गोपीनाथ मुंडे व विमलताई मुंदडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर उमेदवारांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सभेत नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच ही निवडणूक महाराष्ट्राचं भविष्य घडविणारी आणि जनतेचं भाग्य बदलणारी असल्याचे सांगितले.

योग्य उमेदवार निवडून दिल्यानंतर सर्वांगिन विकास होतो हे सांगताना त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. त्यात ६० वर्षे काँग्रेस पक्षाने कारभार केला. गरीबी हटावचा नारा देताना कागदावर वीस कलमी कार्यक्रम राबविला. मात्र चेले चपाटे आणि प्रस्थापित भांडवलदाराची चाकरी करत चुकीचे आर्थिक धोरण आणि भ्रष्टाचाराने देश पोखरून ठेवला. आम्ही खोट नाट बोलून जनतेची दिशा भूल करत नाही. ईमानदारीने लोकांची सेवा करणे हा आमचा धर्म असून, अवघ्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत कसा असतो हे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले. केज विधानसभेच्या उमेदवार नमिताताई मुदडा यांच्या प्रचारासाठी भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अंबाजोगाई येथे आले आसता मी कधीच भुलथापा देत नाही तुम्ही नमिताताई मुंदडा यांना निवडून द्या मी चार महिन्यात बर्दापूर ते लोखंडी सावरगाव फाटा हा चार पदरी रस्ता करून देतो असे उपस्थितांना आश्वासित केले. महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांनी कधी जाततीयवाद केला नाही. कोणतीही योजना देताना जात पाहिली गेली नाही. सर्वांना समान योजना देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. परंतु काही लोक दलितांना संविधान बदलण्याच्या भाषा करतात, आम्ही संविधान बदलणारे नाहीत व बदलू ही देणार नाहीत असा ठाम विश्वास उपस्थितांना दिला आहे. तसेच मुस्लिमांना भाजपा हा मुस्लिम विरोधी आहे जातीवादी आहेत अशी भीती दाखवून मुस्लिमांचे मत घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. यामुळे सर्वांनी विकास करण्यासाठी विकासाला मत द्यावे आशी गडकरी यांनी नम्र विनंती केली.

तुतारीवाल्याने आपला पराभव केला आता तुतारीवाल्याचा पराभव करण्याचा मोका आहे — आ. पंकजाताई मुंडे.

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीयसचिव आ. पंकजाताई मुंडे सांगितले की, मी महाराष्ट्रभर प्रचार करत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातली केज विधानसभा मतदारसंघाची ही जागा मी दत्तक घेतलेली आहे, यामुळे तुम्ही नमिता ताई अक्षय मुंदडा यांना प्रचंड मताने निवडून आणा असे आवाहन पंकजाताईंनी केले. तसेच स्टेजवर बसलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती केली की, नमिताताईला निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मला दुसऱ्यांच्या सेवेसाठी सभा घेण्यासाठी जायचे आहे,यामुळे आपण सर्वांनी ही निवडणूक आपली सर्वांची आहे म्हणून लडायची आहे.व नमिताताईंना निवडू द्यायचे आहे. त्याचबरोबर ही निवडणूक माझ्या अस्मितेची नसून ही निवडणूक तुमच्या अस्मितेची आहे. तुतारीवाल्याने आपला पराभव केला आता तुतारीवाल्याचा पराभव करण्याचा मोका आलेला आहे, ही संधी दवडू नका, असे अवाहन करत आपण सर्वांनी मिळून नमिताताई मुदडा यांना निवडून द्यावे अशी विनंती आ. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये