महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज अंबाळाच्या बर्डावर आमदार पंकजाताईंची सभा
प्रतिनिधी/ केज: बीड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड झाले असून, आमदार पंकजाताई व भाजपाच्या माजी खासदार प्रीतम ताई मुंडे त्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असून, त्याच धर्तीवर केज विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज दुपारी ठीक चार वाजून 30 मिनिटांनी केज तालुक्यातील बरड फाट्यावर आमदार पंकजाताई मुंडे यांची सभा आयोजित केल्याची माहिती नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचार कार्यालयातून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदबार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज शनिवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता बरड फाटा, केज येथे भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी नम्र विनंती व आवाहन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा व केज विधानसभा मतदारसंघ भाजपा, महायुतीच्या वतीने करण्यात आलेआहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.