केज येथील पत्रकार प्रकाश मुंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर.
प्रकाश मुंडे च्या मुलाचे पुणे येथे अपघाती निधन.
सोमवारी सकाळी केज येथे अंत्यसंस्कार.
केज : केज येथील डिजिटल मीडियाचे पत्रकार प्रकाश मुंडे यांच्या राहुल नावाच्या मुलाचा दुचाकीवरून प्रवास करताना पुणे येथे अपघात झाला असून, उपबारादरम्यान राहुलचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाल्याने प्रकाश मुडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केज येथील शिक्षक कॉलनी वर वास्तव्यास असलेले डिजिटल मीडियाचे पत्रकार प्रकाश मुंडे यांचा मुलगा राहुल मुंडे वय वर्ष 22 हा पुणे येथे एका कंपनीमध्ये सर्विस करत होता. मात्र मागच्या पाच दिवसांपूर्वी तो स्कुटी वरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्याला पाठीमागून धडक दिली, आणि यामध्ये राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघात झाल्यानंतर तात्काळ त्याला पिंपरी चिंचवड येथील एका खाजगी नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. ऍडमिट केले त्या दिवसापासून राहुलची मृत्यूशी झुंज चालू होती. हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी प्रयलांची पराकाष्टा करूनही राहुलने आज रविवारी अखेरचा श्रास घेतला. प्रस्तुत दुर्दैवी अशा घटने मुळे प्रकाश मुंडे यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. प्रकाश मुंडे यांची आर्थिक परिस्थिती अतिशय जेमतेम असली तरी, पिंपरी चिंचवड येथील महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु केले होते. परंतु सर्वांचे प्रयल व्यर्थ गेले आणि राहुलने अखेरचा श्वास घेतला. राहुल याच्यावर सोमवारी सकाळी केज येथील क्रांतीनगर स्मशानभूमीत राहुल वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाठलाग परिवार प्रकाश मुंडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. राहुल ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🌷.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.