“पंकू पंकू” म्हणून आमदार पंकजाताईंना हिनवणाऱ्या धसांचे आरोप ओबीसींच्या जिव्हारी!!
आष्टी : आष्टी विधानसभा मतदार संघात भाजपची उमेदवारी सुरेश धस यांना मिळवून देण्यामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका राहिली आणि केवळ उमेदवारीच दिली नाही तर, आष्टी मतदार संघात दोन प्रचार सभा घेऊन निवडून आणले असताना, निवडून आलेल्या आ. सुरेश धस यांनी काल विजयाचा गुलाल अंगावर पडताच आपल्याच नेतृत्वाला काळा बुक्का लावल्याचे काम केल्याने संपुर्ण मतदार संघात नव्हे तर राज्यभरातील ओबीसी समाजात तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. अगोदरच केवळ ओबीसी असल्यामुळे पंकजाताईंना लोकसभा निवडणूकीत मराठा समाजाचा मोठा रोष पत्करावा लागला होता. तो जिव्हारी लागलेला पराभव विसरुन ताईंनी फक्त आष्टी, माजलगाव, गेवराई मध्येच नाही तर महाराष्ट्रातील २७ मतदार संघात मराठा समाजाच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यापैकी २३ आमदार निवडून सुध्दा आले आहेत. यामध्ये बहुतांश आमदार मराठा समाजाचे आहेत. मात्र उपकाराची फेड अपकाराने कशी करावी? याचे उदाहरण आ. सुरेश धस यांनी दाखवून दिल्यामुळे पुन्हा बीड जिल्ह्यात जातीवादाच्या आठवणी जागृत झाल्याचे चित्र आहे. काल विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर महायुतीचा राज्यभरात महाविजय साजरा करण्यात आला. संपुर्ण राज्याचे लक्ष पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाकडे होते. ताईंचा लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ज्यामुळे स्व. मुंडे आणि पंकजाताई यांना मानणारा महाराष्ट्रातील वर्ग एका अर्थाने समाधानी झाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सहा पैकी पाच विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचे निश्चित झाले होते. परंतु पंकजाताईंनी वरिष्ठ स्तरावर आग्रह करुन आष्टीची जागा भाजपच्या पारड्यात घेतली होती . तरी देखील त्या ठिकाणी अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार भाजपच्या विरोधात उभा करण्यात आला होता, या मागचे गमक धसाने ओळखून न घेता, त्या उलट ज्यांनी उमेदवारी दिली, दोन प्रचारसभा घेतल्या, तोंड भरुन कौतुक केले. आणि निवडून देखील आणले,त्या पंकजाताईंच्या विषयी निवडून येताच कतृघ्नपणा दाखवणे मतदारांना आणि पर्यायाने ओबीसींना आवडलेले नाही. काल विजयानंतर झालेल्या सभेत बोलतांना आ. धस यांनी पंकजाताई यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीला जावून टिका केली. निवडून येताच सुरेश धस यांनी सरड्याप्रमाणे विजयी सभेतच आपला रंग बदलला. आणि पंकजाताई वर नको नको त्या शब्दात जहरी टीका करत आरोप केले. नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी पंकजाताई वर केलेले आरोप आणि विजयी सभेत आपल्या नेतृत्वाचीच केलेली टिंगल हा विषय फक्त बीड जिल्ह्यापुरताच नव्हे तर महाराष्ट्रभर गेला असून, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हमेशा म्हणायचे मुंडेंचे मीठच आळणी आहे, कितीही मोठे केले तरी त्याची परतफेड अशीच होते. हे कालच्या आमदार सुरेश धस यांच्या पंकजाताईंच्या विरोधातील टिके वरून स्पष्ट झाले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.