अंतर महाविध्यालयिन वक्तृत्व स्पर्धेत डाॅ.दिपक पाटील आयुर्वेद महाविद्यालयाच्याडाॅ.ऋतुजा मुंडेने पटकावले दुसर्या क्रमांकाचे बक्षीस!
कोल्हापूर: कै. डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त दिगंबर जैन बोर्डिंग दसरा चौक कोल्हापूर यांचे मार्फत अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्पर्धकांना विविध ज्वलंत विषयांवर टाईम बाॅन्डीग बोलण्याची संधी देण्यात आली होती. डाॅ.दिपक पाटील आयुर्वेद महाविद्यालयाच्या डाॅ.ऋतुजा मुंडे हिने ‘खरंच भारतीय स्त्री स्वतंत्र आहे का?’ या विषयावर आपले परखड मत व्यक्त केले.
घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये डाॅ.दिपक पाटील आयुर्वेद कॉलेजची विद्यार्थिनी कु. ऋतुजा शिवदास मुंडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.बक्षिसाचे स्वरूप ७ हजार रुपये,स्मृती चषक व प्रमाणपत्र असे होते. तिच्या या यशाबद्दल तिला संस्थेच्या सचिवा डॉ.सौ स्वाती पाटील मॅडम, संचालिका डॉ. स्मिता पाटील मॅडम, प्राचार्य डॉ. नितीन ताटपुजे सर तसेच डॉ. केदार तोडकर सर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे ऋतुजाने बोलतांना सांगितले. बक्षिसाचे स्वरूप ७ हजार रुपये,स्मृती चषक व प्रमाणपत्र.असे आहे. डाॅ.ऋतुजा मुंंडे चे सर्व स्थरातून आभिनंदन होत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.