ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

केज विधानसभेच्या विद्यमान आमदाराला अनेक इच्छुक उमेदवारांचा नियोजित घेराव! माजी आ.साठे,माजी आ.प्रा.ठोंबरे,डॉ.घाडगे, डाॅ.राहूल शिंदे,जाधव इंजि.शिंदे,सिरसाट, गालफाडे तात्या इच्छुक.

पाठलाग न्युज/ परमेश्वर गित्ते:

केज विधानसभेच्या विद्यमान आमदाराला अनेक इच्छुक उमेदवारांचा नियोजित घेराव! माजी आ.साठे,माजी आ.प्रा.ठोंबरे,डॉ.घाडगे, डाॅ.राहूल शिंदे,जाधव इंजि.शिंदे,सिरसाट, गालफाडे तात्या इच्छुक.

—————————————- . केज: केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आ.नमिताताई मुंदडा यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाची टिम सक्रिय झाली असून, ही निवडणुक राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शेवटची संधी असल्याने या मतदार संघातील अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहेत. सर्वच इच्छुक उमेदवारांनी लढण्याची जय्यत तयारी सुरु केल्याचे चित्र आहे.आपण निवडून नाही आलो तरी चालेल परंतू,कुठल्याही परिस्थितीत काकाजींची सून आ.नमिताताई मुंदडा यांना पराभूत करण्याचा विडाच अनेकांनी उचलला असल्याचे चित्र आहे. केज मतदार संघातून लढण्यासाठी माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे, डॉ.सौ.अंजलीताई घाडगे, सौ.मनिषाताई गोकुळ जाधव, इंजि. एन.डी.शिंदे, डॉ. नयनाताई सिरसाट,रमेश गालफाडे, डाॅ.राहूल शिंदे व इतरांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

दर निवडणुकीपेक्षा ही निवडणुक आगळी- वेगळी असणार आहे; कारण या निवडणुकीला जातीपातीचा रंग आहे,शिवाय जिंकणार कोण याचेही उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळे ही निवडणुक अति चुरशीची होणार आहे हे निश्चित आहे.केज विधानसभा मतदार संघ हा गेल्या 45 वर्षापासून एस्सी साठी आरक्षित आहे. 2009 साली या मतदार संघाची पुर्नरचना झाली पण पुन्हा हा मतदार संघ अनुसुचित जाती जमातीसाठी आरक्षित झाला. खुल्या प्रवर्गातील उमेदवार लढण्यासाठी इच्छुक असतानाही आरक्षित जागेमुळे या क्षेत्रातील अनेकांना आमदार होता आलेले नाही. जवळपास राजकारण्यांच्या तीन पिढ्या यात हिरमुसून गेलेल्या आहेत. 2029 साली हा मतदार संघ अनारक्षित राहणार असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग आतापासून बांधले आहे. 2024 ची निवडणुक ही आगळीवेगळी आणि अनपेक्षित होणार आहे. विद्यमान आमदारांना घेरण्यासाठी जोरदार रणनिती सुरु आहे. विद्यमान आमदारांविषयी केज विधानसभा मतदार संघात नाराजीचा सूर आहे. विकास कामे झाली आहेत पण त्यातून विकास नेमका कोणाचा झाला हे मात्र सामान्य माणसाला उमगलेले नाही. मतदारसंघात आमदारांविषयी प्रचंड नाराजी आहे. समाज माध्यमातून या विषयी व्यक्त होत असल्याचे चित्र आहे. मराठा समाज आमदारांना आरक्षणाविषयीची भुमिका विचारतो आहे तर ओबीसी बांधव सुद्धा आमदारांना कोणाच्या बाजूने आहात असा सार्वजनिक सवाल करीत आहेत. या मतदार संघात येणार्‍या विधानसभेची निवडणुक ही चुरशीचा होणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. केज विधानसभा मतदार संघाचे माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे, उद्योजिका सौ.मनिषाताई गोकुळ जाधव, रमेश गालफाडे, इंजि. एन.डी.शिंदे, अ‍ॅड.शिवाजी कांबळे, समाजसेवक रणधीर कांबळे,डॉ. नयनाताई सिरसाट,सौ.संगिता तुपसागर तसेच कै.आ.मेटे यांच्या गावचे लढाऊ युवक डाॅ.राहूल शिंदे यांची नांवे पुढे आली आहेत. ही निवडणुक विद्यमान आमदारांना म्हणावी तशी सोपी नाही. कारण सध्या सत्ताधार्‍यांविषयी जनसामान्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि भ्रष्टाचार्‍यांची सोबत सामान्य माणसाला पटलेली नाही. लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे केज मतदारसंघात कोण जिंकणार हे आज कोणीही ठाम सांगू शकत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे या निवडणुकीला रंगत येणार हे स्पष्ट आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये