ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पंकजाताईंच्या पराभवाला हातभार लावणारेच पुन्हा ताईंच्या कामकाजात ‘ “कारभारी”!! परळी, अंबाजोगाई व केज येथील कार्यकर्त्यात संताप.

पाठलाग न्युज/विशेष प्रतिनिधी:

पंकजाताईंच्या पराभवाला हातभार लावणारेच पुन्हा ताईंच्या कामकाजात ‘ “कारभारी”!!

परळी, अंबाजोगाई व केज येथील कार्यकर्त्यात संताप.

 

—————————————- अंबाजोगाई: बीड लोकसभा निवडणुकीत “महायुतीच्या” उमेदवार आ.पंकजाताई मुंडे यांच्या पराभवाला अनेक ड्युप्लीकेट आणि ‘दुःखी’ आत्म्यांनी हातभार लावण्याचे काम केले.अक्षरशः त्यांच्या गावात व त्यांच्या हक्काच्या बुथवर पंकजाताईंना मते मिळाली नाहीत. तेच नेते व काही चमचेगिरीत प्रविण असलेले कार्यकर्ते आज पंकजाताई व ना.धनंजय मुंडे यांच्या ‘ कंपूत ‘ कारभारी म्हणून एकनिष्ठतेच्या तोऱ्यात मिरवत असल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांना तर उलट ताई-भाऊने बक्षीशी दिल्यासारखेच दिसत असून, हे चित्र पाहिल्यानंतर मुंडे-बहीण भावाचे खरे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र संताप व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. . बीड लोकसभा निवडणूक राज्यात व देशात लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे व ना.धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.बहीण भावासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. कमी वेळेत दोघांनीही जिल्हाभरात दारोदारी फिरून मतपरिवर्तन व मन परिवर्तन करण्याचे काम केले. लोकसभा निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी अशा महादडपणाखाली संपन्न झाली हे सत्य आहे आणि झाली सुद्धा. तसेच, ज्यांना कोटी-कोटीची, लाखो-लाखोंची कामे दिली. मान- सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली. त्यांनी मात्र केवळ नेत्यांच्या सोबत राहून स्टेजवरची जागा गुंतवून ठेवण्याचेच काम केल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. ज्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळवून घेतला ,त्यांनी प्रामाणिकपणे आपआपल्या सग्या- सोयऱ्यांना किंवा सहकारी कार्यकर्त्यांना विनंती जरी केली असती तरी, चित्र बदलले असते परंतु, कोणीच काही केले नाही.केवळ स्टेजवर मिरवणे हेच काम प्रामाणिकपणे केले. काहींनी तर थेट पंकजाताईंना अमक्याचा माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप नको तर तमक्याने इकडे फिरकूच नये अशी भूमिका घेतली. नेमकी हीच संधी ‘ फितूर ‘ नेत्यांना सापडली. नेत्यांच्या हस्तक्षेपाच्या भूमिकेकडे त्यांनी केवळ पुढे-पुढे करण्याचे काम केले. संपूर्ण जिल्ह्यात असेच चित्र होते.कोणीही हस्तक्षेप करून वातावरण खराब करू नये असा पक्ष नेतृत्वाचा आदेश होता म्हणून ज्यांनी त्यांनी आपआपलेच बघण्याची भूमिका घेतली.कोणीही मनातून काम केले नाही. त्याचा परिणाम पंकजाताईंच्या पराभवात झाला. येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. परिस्थिती आहे तशीच आहे,त्यात किंचितही बदल झालेला नाही. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. पण पंकजाताईंच्या पराभवाला ज्यांनी हातभार लावला तेच नेते आता ‘लखोबा लोखंडे’ च्या ‘ तो मी नव्हेच ‘ या भूमिकेत वावरत असल्याचे दिसत आहेत. त्यांनाच पुन्हा बहीण-भावाकडून मानसन्मान आणि पदे वाटली जात आहेत. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये संताप दिसू लागला आहे. कारण ज्यांनी ताईंवर आणि भाऊवर ही नामुष्कीची वेळ आणली. त्यांनाच जर मान – सन्मान, प्रतिष्ठा व कारभार मिळणार असेल तर, आम्ही केवळ सतरंज्याचेच मालक राहायचे का? असा सवाल व्यक्त केला जाऊ लागला आहे. अनेकांनी गेल्या पाच वर्षात अनेक पक्ष पादाक्रांत केले, ज्यांनी नेतृत्वाच्या विरोधात काम केले,त्यांच्या गावात पंकजाताईंना अपेक्षित मते मिळाली नाहीत मग त्यांनाच जर डोक्यावर घेणार असाल तर तुमचा पक्ष तुम्हाला लखलाभ अशी चर्चा निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. तेव्हा राजकीय नेत्यांनी याचा विचार करण्याची वेळ आली आहे. नाही तर पुन्हा पंकजाताई सारखा पराभव पचणी पाडावा लागण्याची तयारी ठेवावी लागेल. इतरांना आपले म्हणता म्हणता आपलेच कधी परके होतील हे सांगता येत नाही. ‘ जो बुंद से गयी, ओ हौद से नहीं आती ‘ एवढे मात्र खरे!

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये