Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निर्दोषांनी घाबरू नये,कारवाई फक्त दोषींवरच” – राज्यमंत्री पंकज भोयर यांचे SIT ला भेदरलेल्या अधिकाऱ्यांना आश्वासन.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

निर्दोषांनी घाबरू नये,कारवाई फक्त दोषींवरच” – राज्यमंत्री पंकज भोयर यांचे SIT ला भेदरलेल्या अधिकाऱ्यांना आश्वासन.

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज जी भोयर.

मुंबई /प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी राज्यस्तरीय एसआयटीची घोषणा झाल्याबरोबर शिक्षण विभागातले तालुका स्तरापासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंतचे अधिकारीच नव्हे तर, शिक्षण संस्था चालक व इन्फेक्टेड शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रचंड धास्तावले असून, पुण्याच्या शिक्षण संचालकापर्यंतचे बहुतांश कर्मचारी हे संघटनांचा आधार घेत आंदोलने करणे व रजा घेऊन लपण्याचा प्रयत्न करत असतानाच निर्दोष असलेल्या एकाही संबंधिताला कसलाच धक्का लावला जाणार नसून, केवळ प्रस्तुत घोटाळ्याची लागण झालेल्या इनफेक्टेड संबंधितावरच एसआयटी कारवाई करेल हे निश्चित आहे. त्यामुळे निर्दोष अधिकाऱ्यांनी उगीचच घाबरून न जाता त्यांना कुठलाही त्रास होणार नसल्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज जी भोयर यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या कारवाईच्या भीतीने शिक्षण क्षेत्रातील अनेक अधिकारी-कर्मचारी रजा घेणे आणि आंदोलने करण्याच्या हालचाली करत असताना, राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज जी भोयर यांनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले आहे की, “केवळ दोषी आढळलेल्यांवरच कारवाई होईल. प्रामाणिक व निरपराधांनी घाबरण्याचे कारण नाही.” शालेय शिक्षण विभागातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे. यामुळे काही ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली असून, अनेकांनी अचानक रजा घेतली आहे. यावर भाष्य करताना भोयर म्हणाले की, “सरकारचा उद्देश कोणालाही विनाकारण त्रास देणे नाही. चौकशी पारदर्शक पद्धतीने होईल आणि फक्त पुरावे असलेल्या दोषींनाच कायद्याचा सामना करावा लागेल.” राज्यमंत्री भोयर यांनी आंदोलने करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की, “अशा प्रकारच्या हालचालींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. आपण निर्दोष असाल, तर चौकशीला सामोरे जाण्यात घाबरण्याचे कारण नाही.” तसेच, SIT ला देखील त्यांनी सूचित केले आहे की निरपराधांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सरकारकडून भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी नवे नियम आणि नियंत्रण यंत्रणा लागू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये