एसआयटीच्या तपासाच्या धास्तीने शिक्षण खात्यात मोठी खळबळ; कारवाईला भेदरलेले अनेक अधिकारी संघटनेच्या छत्राखाली रजेवर!
वृत्तसंस्था/ प्रतिनिधी: राज्य शिक्षण विभागात झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्या च्या तपासासाठी गठीत करण्यात आलेल्या’ एस आय टी’ चा तपास सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच आगामी तपासाच्या धास्तीने राज्याच्या शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली असून, नागपूर विभागाच्या पार्श्वभूमीवर विविध गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय एसआयटी पथक कडक कारवाई करणार असल्याने अनेक वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी मानसिक दडपणाखाली आले असून, त्यापैकी बऱ्याच अधिकाऱ्यांनी विविध कारणे दाखवून अचानक रजा घेतल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांनी तर शिक्षण विभागाच्या कर्मचारी संघटनांचा आधार घेत संघटनेच्या संरक्षणाखाली राहण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचे चित्र कालपासून राज्यभर दिसत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच गठीत करण्यात आलेली राज्यस्तरीय एसआयटी सध्या शालार्थ आयडी घोटाळ्यासह शिक्षक भरती, बदली, शैक्षणिक अनुदान वितरण तसेच शैक्षणिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करू लागले आहे. 20 12 ते 20 25 या दरम्यानची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची सर्व कागदपत्रे 30 ऑगस्ट2025 पर्यंत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाइन करण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला असून, त्या अगोदर उपलब्ध असलेली प्राथमिक टप्प्यातच काही कागदपत्रे आणि फाइल्स जप्त केल्याने संबंधित अधिकारी अधिकच सावध झालेले दिसत आहेत. तपास पथकाच्या हालचालींमुळे शिक्षण विभागाचे कार्यालयीन वातावरण तणावग्रस्त झाले असून, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्थिती रजिस्टरमध्येही लक्षणीय घट झालेली दिसत आहे. काही अधिकाऱ्यांनी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून “तपासात अडकण्यापूर्वी आरोग्य कारणास्तव किंवा वैयक्तिक कारणास्तव रजा घेणे” हा पर्याय निवडला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संघटना यामध्ये अधिकाऱ्यांना कायदेशीर व मानसिक आधार देत असून, तपासाची व्याप्ती आणि प्रक्रियेत पारदर्शकता याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. याबाबत एका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, “एसआयटीचा तपास पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावा याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, निरपराध अधिकाऱ्यांना अनावश्यक त्रास देणे आम्ही सहन करणार नाही.” दरम्यान, शिक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवर याबाबतची गुप्त बैठक घेतली गेल्याची माहिती मिळाली आहे. तपास लांबल्यास रजेवर गेलेले अधिकारी परत येण्याची शक्यता कमी असल्याचेही संकेत मिळत आहेत. राज्यातील शिक्षकांच्या पगार बिलावर सही न करण्याचा निर्णय देखील संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, तपासाची दिशा आणि त्याचे परिणाम याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील बीड आणि लातूर या दोन जिल्ह्यांमधील शालार्थ आयडी घोटाळ्याची परिस्थिती अतिशय भयानक असल्याची सर्वत्र चर्चा असून, या दोन्ही जिल्ह्यातील 20 12 पासूनचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी या घोटाळ्यात गुंतले असल्याची चर्चा आहे. बीड जिल्ह्यातील 20 12 पासून चे सर्व वेतन पथकाचे अधीक्षक व वीस बारा पासून चे तत्कालीन शिक्षणाधिकारी काही ना काही प्रमाणात शालार्थ आयडी घोटाळ्याने इनफेक्टेड असल्यामुळे यांच्यामध्ये कमालीची धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.