बीड/ वृत्तसेवा : साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त देवगिरी प्रतिष्ठान, बीड संचलित तुलसी समूह यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा बीड येथील तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात रविवारी (३ ऑगस्ट) रोजी उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी डॉ. साठे यांच्या कार्याचा मागोवा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुलसी समूहाचे सर्वेसर्वा प्रा. प्रदीप रोडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनोहर सिरसाट, मराठवाडा शिक्षक संघाचे राजकुमार कदम, उत्तम अंभोरे, रामकिशन जोगदंड, राम गायकवाड, अर्जुन राठोड, डॉ. सुनील जोंधळे आदी उपस्थित होते. स्पर्धेत राज्यभरातून शालेय आणि महाविद्यालयीन गटांतील १५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. पांडुरंग सुतार, डॉ. चंद्रकांत साळवे, शरद सदाफुले, डॉ. नामदेव शिनगारे आणि प्रा. महादेव जगताप यांनी केले. स्पर्धकाची भाषाशैली, सादरीकरण, विषय समज व समारोप या मूल्यांकनावर आधारित स्पर्धकाचे परीक्षण करण्यात आले. या उपक्रमाचे प्रास्ताविक. प्रा. डी. जी. निकाळजे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अंकुश कोरडे व प्रा. किशोर वाघमारे, तर आभार प्रदर्शन डॉ. विकास वाघमारे यांनी केले. देवगिरी प्रतिष्ठान गेली १६ वर्षे सातत्याने ही स्पर्धा आयोजित करत असून, विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवृत्ती, सृजनशीलता आणि समाजप्रबोधनाची जाणीव निर्माण होणे, हाच या स्पर्धामागील उद्देश असल्याचे प्रा. प्रदीप रोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. स्पर्धकांसाठी अल्प- उपहार व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम क्रमांकः मिथुन माने (सातारा) १०,०००/, द्वितीयः ऋतुजा शिवदास मुंडे ( डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक व मेडिकल कॉलेज,कोल्हापूर) ७,०००/, तृतीयः मोहिनी पायझम (माजलगाव) – ५,०००/, कनिष्ठ गटात, प्रथम क्रमांकः प्रणाली धस (बार्शी) ७,०००/, द्वितीयः आस्था सोहनी (बीड) ५,०००/, तृतीयः दिशा मुंगळे (लातूर) – ३,०००/-. दोन्ही गटांतील तीन-तीन स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार चे उत्तेजनार्थ पारितोषिक देखील देण्यात आले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.