केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी /केज : बोरी सावरगाव (ता. केज) येथे महान समाजसुधारक, लोककलावंत आणि श्रमिकांचा आवाज असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन वीर फकीरा ग्रुप, बोरी सावरगाव ग्रामपंचायत व स्थानिक युवक मंडळ तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते. शिबिरामध्ये गावातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमात शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या डॉक्टरांच्या पथकाने तांत्रिक मदत व रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास बोरीसारगाव चे सरपंच वैजनाथ रामभाऊ देशमुख उपसरपंच बाळकृष्ण रामलिंग यादव माजी उपसरपंच अंगद श्रावण पोळ ग्राम सदस्य अक्षय रावन पोळ, ग्राम सदस्य विनोद सटवा पोळ, ग्राम सदस्य गंगाधर अंबादास पौळ, जालिंदर पोळ, योगेश प्रकाश देशमुख ज्योतीभाऊ मुळे,राजपाल भैया काकडे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरज कुंडलिक पोळ, उपाध्यक्ष दत्ता नंदू राव पौळ, सचिव सत्यजित महादेव पोळ, खजिनदार साई बजरंग पोळ ,कार्यक्रमाचे सल्लागार अंगद श्रावण पोळ, अजय भिवाजी पोळ गोविंदा तुळशीराम पोळ, दत्ता मारुती पोळ, नितीन बापू पोळ, प्रकाश धनराज पोळ,आकाश धर्म पोळ,राहुल संतोष पोळ,राहुल ज्ञानोबा पोळ, बालाजी बापू वाघमारे, आकाश हरिभाऊ पोळ, कुलदीप रमेश पोळ,कुणाल गुरुरोबा पौळ, आदींनी केले. सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी केली. ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व युवकांनी साठे यांच्या कार्याचा उल्लेख करत सामाजिक समतेचा संदेश दिला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या तत्त्वाने प्रेरित होऊन आयोजित केलेल्या या शिबिरातून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणा जागृत झाली.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.