Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे हिने पटकावले दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक.

पाटलाग न्यूज/ प्रतिनिधी :

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे हिने पटकावले दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक.

बीड: देवगिरी प्रतिष्ठान, बीड संचलित “तुलशी समूह” च्या वतीने आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त राज्यस्तरीय शालेय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन तुलसी संगणक महाविद्यालय,बीड येथे नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक नामांकित महाविद्यालयांतील जवळ जवळ 41  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत डॉ. दीपक पाटील आयुर्वेद व वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील फायनल इयर ची विद्यार्थिनी डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे हिने प्रभावी पणे आणि सुसंस्कृतपणे आपले विचार सादर करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून बीड आणि कोल्हापूरचे नाव उज्वल केले.

डॉ. ऋतुजा मुंडे यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा इतिहास, त्यांच्या लेखणीतील क्रांतीकारी विचार, आणि समाज परिवर्तनासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रभावीपणे उलगडला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचारांचा प्रभाव समाज परिवर्तनासाठी व्हावा आणि समाजात घडत असलेल्या अनुचित घटना पुन्हा घडू नयेत, बीडच्या शिक्षण क्षेत्रातील अनुचित घटनेचा उल्लेख करत तिने अतिशय प्रभावी विचार मांडले. डॉक्टर ऋतुजा मुंडे चे शब्दसामर्थ्य, आत्मविश्वास, पोलाइटली वक्तृत्व आणि शांत सुसंवादाने श्रोते भारावून गेले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राज्यस्तरीय ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ञ सुतार सर व जोगदंड सर यांनी आपली न्यायदानाची व गुणदानाची भूमिका बजावली. . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देवगिरी प्रतिष्ठान तथा तुलशी समूहाचे सर्वेसर्वा माननीय प्रा. प्रदीप रोडे सर_यांनी भूषवले. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक संघाचे  राजकुमार कदम उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी “तुलशी समूह” चे समन्वयक, संयोजक आणि सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल डॉ. ऋतुजा मुंडे यांचे महाविद्यालय, कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्याकडून आगामी काळात अशाच प्रकारच्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉक्टर ऋतुजा मुंडे हिने आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या सर्व मार्गदर्शक प्राध्यापकांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये