वंजारीसेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा. आ. गोविंद अण्णा केंद्रे यांची निवड.
तेलंगणा : दिनांक २२ जून २०२५ रोजी यादगिरीगुटा तेलंगणा राज्य या ठिकाणी वंजारी समाजाची राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेला देशभरातील ७ राज्यातून समाज बांधव उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी यजमान म्हणून अमरपेट हैदराबादचे आमदार वेंकटेश कालेरू हे होते. बैठकीत देशभरातील समाज बांधवांच्या विविध समस्या तसेच भविष्यातील वाटचालीवर संगोपांग चर्चा करण्यात आली.
समाजाच्या विविध प्रश्नावर या परिषदेत अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले. सदरील सर्व ठरावांना सर्वानुमते मान्यता मिळाली. त्यानंतर राष्ट्रीय वंजारी सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात वंजारी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माजी आमदार गोविंदा आण्णा केंद्रे यांची तर राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांच्या नावाची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माजी आमदार आदरणीय संजयभाऊ दौंड व आमदार व्यंकटेश कालेरू यांच्याकडे तर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी तेलंगणा येथील ज्येष्ठ समाजसेवी रामोजीअण्णा कालेरु यांच्या कडे सोपवण्यात आली. यावेळी वंजारी सेवा संघाचे राज्यभरातील पदाधिकारी यांच्यासोबत माजी आमदार तोतारामजी कायंदे , माजी आमदार नारायणराव मुंडे, डॉ राजेश कराड, सौ. अंजली भागवत कराड, धुळ्याचे महापौर प्रदीप करपे, भगवान गडाचे ट्रस्टी मा. राजेंद्रजी राख, वंजारी सेवा संघाचे संस्थापक राहुल जाधवर, वंजारी सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मानसिंगराव माळवे, प्रदेश कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे.प्रदेश महासचिव बाजीराव दराडे, सरचिटणीस बिबीशन पाळवदे, वंजारी संघाचे तेलंगणाचे अध्यक्ष नरेश कलेरू, कंडारी व्यंकटेशम, अमरेंद्र कालेरु, सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे, डॉ मंजुषा दराडे, सौ. सविताताई मुंडे, दिनकर पाटील शेप, उर्फ डी के पाटील गोवा, मा. अरुणजी खरमाटे, संजय काळबांडे, विजयालक्ष्मीजी यांच्यासह सात राज्यातून आलेले वंजारी सेवा संघाचे प्रमुख समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत वंजारी सेवा संघ यांच्या वतीने सर्वसंमतीने बैठकीत ठरल्यानुसार व्यासपीठावर सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यापुढील काळात या सर्व राष्ट्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील वंजारी समाजाला एकत्रित करण्याचे भरीव काम करण्यात येईल. यासोबतच वंजारी समाजाचा इतिहास व भूगोल या विषयावर मंथन करून सर्व समाजासमोर काही बाबी मांडण्यात येणार असल्याची चर्चा करण्यात आली.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.