Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी संपूर्ण राज्यात एसआयटी घोषित करा. अन्यथा ती जून पासून राज्यव्यापी आंदोलन, राज्य शिक्षक परिषदेचा यलगार.

पाठलाग न्यूज / वृत्तसेवा:

शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी संपूर्ण राज्यात एसआयटी घोषित करा. अन्यथा ती जून पासून राज्यव्यापी आंदोलन, राज्य शिक्षक परिषदेचा यलगार.

प्रतिनिधी : सन 20 12 पासून शिक्षक भरतीचा चालू असलेला धुमाकूळ हा केवळ विदर्भा च्या नागपूर पुरताच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातल्या सर्वच जिल्ह्यात हा शिक्षक भरतीचा धुडगूस चालू असून, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या प्रस्तुत शिक्षक भरती घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एसआयटीची तात्काळ घोषणा करावी नाहीतर येत्या 30 जून पासून आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यप्रमुख तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील या मागणीची दखल घेऊन 2 मे 20 12 पासून शिक्षक भरतीवर ब्यान असताना राज्यात हजारो शिक्षकांची भरती कशाप्रकारे व कोणत्या नियमाने करण्यात आली हे तपासण्यासाठी राज्यव्यापी एसआयटी नेमण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असल्याची चर्चा समोर आल्याने शिक्षण क्षेत्रातले भ्रष्ट अधिकारी व संस्थाचालक यांची पाचावर धारण बसल्याचे चित्र आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती घोटाळा सुरू असून,जिल्हास्तरापासून मंत्रालयस्तरापर्यंतचे शिक्षण विभागाचे अधिकारी घोटाळ्यात सहभागी असल्याचे नागपूर जिल्ह्याने दाखवून दिले आहे , त्यामुळे या घोटाळ्याच्या तपासासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एसआयटी गठित करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष माजी आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिक्षण संस्था चालकांनी शिक्षण विभागाच्या सहकार्याने बेरोजगार शिक्षकांना डोनेशनच्या नावाखाली प्रत्येकी ४० ते ५० लाख रुपयांनी लुटले आहे. बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यात तर, काही संस्था चालकांनी संस्था नोंद करून सदरच्या संस्था विक्रीचा धंदा जोमात चालवला आहे. विक्री केलेल्या संस्थावर नसलेले कर्मचारी दाखवून त्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून वेतनाच्या स्वरूपात शासनाच्या तिजोरीवर लाखो रुपयाचा डल्ला मारलेला आहे. त्यांच्या नियुक्त्या बँक डेटेड दाखवून शासनाच्या तिजोरीतून थकीत वेतनाची रक्कम लुटली आहे. या घोटाळ्यात बेरोजगारांना आणि शासनाला १५०० कोटी रुपयांनी लुबाडण्यात आले आहे. काही संस्था चालकांनी तर आपल्या कुरुप मुली डोनेशनच्या स्वरूपात बेरोजगारांना देऊन त्यांच्या बोगस नियुक्ती दाखवून त्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. अनेक संस्थाचालकांनी आपले नातेवाईक,मुले, भाच्चे अशाच भ्रष्ट मार्गाने आपल्या संस्थेवर नियुक्त केलेले आहेत. शिक्षक नियुक्ती घोटाळा राज्यस्तरावर सर्व जिल्ह्यात एकाच पद्धतीने करण्यात आला आहे. घोटाळ्यातून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमाप संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे या घोटाळ्याची तपासणी एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी करीत माजी आमदार नागो गाणार यांनी ३० जून रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाचा ईशारा दिला आहे. शिक्षक भरतीच्या घोटाळ्याच्या तपासासाठी राज्यव्यापी एसआयटी नेमण्यात यावी या मागणीमुळे राज्याचे शिक्षण क्षेत्र हादरले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये