क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, 15 शिक्षकांकडून प्रत्येकी 15 लाख रुपये डोनेशन उकळणाऱ्या संस्थाचालक तथा भाजपच्या बड्या नेत्याला अखेर अटक.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई.

15 शिक्षकांकडून प्रत्येकी 15 लाख रुपये डोनेशन उकळणाऱ्या संस्थाचालक तथा भाजपच्या बड्या नेत्याला अखेर अटक.

वृत्तसंस्था / शिक्षणाच्या काळया बाजारात केवळ प्रशासनातले अधिकारीच दोषी नसून प्रस्तुत शिक्षणाच्या काळया बाजाराचा मुख्य मूळ संस्थाचालक असून, प्रशासन आणि व्यवस्थापन यांच्या संगनमताने राज्याच्या तिजोरीवर दरोडा घालून सही सलामत राहणाऱ्या संस्था चालकांनाही विशेष चौकशी टीमने आपल्या रडारवर घेतले असून, भंडार्यातील चेटूके संस्था चालकाच्या अटकेनंतर तब्बल 15 शिक्षकांकडून प्रत्येकी 15 लाख रुपये डोनेशन घेऊन संबंधिताचे बनावट शालार्थ आयडी तयार करून त्यांच्या बोगस वेतनासाठी शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या संस्थाचालक तथा भाजपाचा बडा नेता दिलीप धोटेला विशेष चौकशी पथकाने अटक करून त्यास पोलीस कोठडीत डांबले आहे. दरम्यान, शिक्षण घोटाळ्याच्या चौकशी पथकाने शिक्षणातील काळया बाजाराला केवळ प्रशासकीय अधिकारीच जबाबदार नसून त्याला शिक्षण संस्थाचालक देखील तितकेच जबाबदार असल्याचे चौकशीत ताढल्यामुळे संस्थाचालक दिलीप धोटे च्या अटकेनंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, नागपूरमध्ये शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात जबरदस्त कारवाई करण्याचा विशेष चौकशी पथकाने सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांना बोगस आयडी बनवून दिल्या प्रकरणी संस्था चालक तथा भाजप नेते दिलीप धोटे यांना अटक करण्यात आली. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नागपूर पोलिसांची ही मोठी कारवाई समजण्यात आली आहे. या प्रकरणात सत्ताधारी भाजपच्या बड्या नेत्याला शिक्षण संस्था चालक आरोपी म्हणूनअटक करण्यात आली आहे. बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांनी 5 शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून त्यांच्या 10 वर्षाच्या वेतन थकबाकीची रक्कम हडप केल्याचा आरोप या भाजप नेत्यावर आहे. दिलीप धोटे असं अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. दिलीप धोटे हे विठ्ठल-रुख्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. शिक्षक भरती घोटाळ्याच्या या एकट्या प्रकरणाच्या तपासात प्रत्येक शिक्षकाकडून लाखो रुपये नोकरी लावण्यासाठी घेण्यात आले. हे पैसे दिलीप धोटे यांनी घेतल्याचा पोलिस विभागाच्या एसआयटीच्या पथकाला संशय आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी, वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यानेच या प्रकरणातील बनावट आयडी तयार केल्याचेही तपासातून उघड झाले आहे. दिलीप धोटे हे कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील भाजप नेते आहेत. त्यांच्या संस्थेच्या कळमेश्वर तालुक्यात प्रतिभा उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळा आणि धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शळा आहेत. पोलिसांनी दिलीप धोटे यांना 5 शिक्षकांचे बनावट आयडी तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे. दिलीप धोटे यांनी काही वर्षांपूर्वी 8 शिक्षकांची बोगस कागदपत्रांच्या आधारे शाळेत नियुक्ती करून अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी तयार केले होते. या घोटाळा प्रकरणातच त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर दिलीप धोटे यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात संस्था चालकांना अटक करण्याचे सत्र नागपूर पोलिसांकडून सुरु आहे. आतापर्यंत शिक्षक भरती घोटाळ्यात 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश जण हे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी असून काही नोकरीसाठी पैसे घेणारे दलाल देखील आहेत. आतापर्यंत 4 शिक्षण उपसंचालक यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तर 20 ते 22 जणांना टप्प्या टप्याने अटक करण्यात आलीआहे. सध्या शिक्षण संस्थाचालक हे पोलिस विभागच्या रडारवर आहेत. या प्रकरणात गोंदियातील संस्था चालकाला अटक करण्यात आली होती. आता शिक्षण संस्था चालक ही विशेष पथकाच्या रडारवर असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये