क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संस्थाचालकाच्या “फुक्कटवापरू ” धोरणाला कंटाळून केज मधल्या शिक्षकाची “(आत्म)हत्या.”

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

संस्थाचालकाच्या “फुक्कटवापरूधोरणाला कंटाळून केज मधल्या शिक्षकाची “(आत्म)हत्या

 

बीड : शाळेला शासनाचे अनुदान नसले तरी, सरकारी नियमानुसार व्यवस्थापनाने कर्मचाऱ्याला पुर्ण वेतन द्यावे असा नियम असताना अठरा वर्षांपासून वेतनाची एक रूपडी ही न देता नोकरीवर फुक्कट भोसडून घेणाऱ्या संस्थाचालक व त्याच्या बगलबच्चा- चाटू- चमच्यांच्या त्रासाला व दहशत दादागिरीला कंटाळून केज तालुक्यातील एका आश्रम शाळेच्या शिक्षकाने संस्था चालकाच्या मालकीच्या असलेल्या बीड येथील निवास व बँकेच्या दारात गळफास लावून आत्महत्या केली असून, सदरची आत्महत्या नसून ती नियोजनबद्ध केलेली ‘हत्या’ असल्याची तक्रार शिक्षकाच्या नातेवाईकांनी पुढे केली आहे.

धनंजय अभिमान नागरगोजे.

दरम्यान, फेसबुक अकाउंट वर मिळून आलेल्या सुसाईड नोट मध्ये बड्या राजकीय नेत्यांची व त्यांच्या बगलबच्च्यांची नावे असल्यामुळे शिक्षण आणि गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा कृष्णा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम बाप्पा मुंडे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केली आहे. कृष्णा अर्बन बँकेच्या बीड शाखेच्या समोरील पटांगणात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. आत्महत्येपूर्वी त्याने स्वतःच्या फेसबुक पेजवर गेल्या 18 वर्षापासून संस्थाचालकांने कशा प्रकारे आर्थिक, शारीरिक व बौद्धिक त्रास दिला हे लिहिले आहे.

केज तालुक्यातील केळगाव( बेलगाव ) येथील आश्रम शाळेत विनाअनुदानीत पदावर शिक्षक म्हणून विनावेतन काम केल्याचे शिक्षकाने म्हटले आहे. शिक्षकाने शनिवारी पहाटेबीड शहरातील कृष्णा बँकेच्या बीड शाखेच्या दारात तथा संस्थेचे सचिव असलेल्या अतुल दादा मुंडे यांच्या निवासस्थानाच्या दारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

केज तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी आणि केळगाव येथील आश्रम शाळेत 18 वर्षापासून कार्यरत असलेल्या धनंजय अभिमान नागरगोजे हा कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता.सदरील शिक्षक हा गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्वावर कार्यरत असूनही त्याला संस्थाचालकाकडून कसलेच वेतन देण्यात आले नाही . सरकारने २०१९ साली २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती . मात्र ते अनुदान सुरू झाले नाही . गेल्या अनेक वर्षांपासून अनुदान नसतानाही विद्यार्थ्यांना घडविण्याचे विना वेतन काम करणार्‍या शिक्षकाने अखेर आपली जीवनयात्रा संपवली.

संस्थेवर अठरा वर्षांपासून नोकरीस असलेल्या धनंजय नागरगोजे यांनी पगार मिळतं नसल्याने त्याने अनेकवेळा मुंडे व त्यांच्या मुलांना भेटून वेतनाची याचना केली, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मला पगार द्या नाहीतर आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही असे म्हटल्यानंतर देखील ” तु, मर म्हणजे आम्हाला तुझ्या जागेवर दुसऱ्या माणसाला घेता येईल’ असे उत्तर स्वतः संस्थाचालक विक्रम बाप्पा मुंडे यांनी दिल्याचे धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या अकाउंट वर टाकलेल्या फेसबुक पोस्टमध्ये धनंजय नागरगोजे या शिक्षकांनी जवळ जवळ पाच ते सहा जणांची नावे टाकून, या व्यक्तींच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबुक वर व्हायरल केली असून, धनंजय नागरगोजे यांच्या नातेवाईकांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये