कोल्हापुरात राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धेत केज च्या ब्रिलियन्स अबॅकस क्लासेसचा विजय!
केज:कोल्हापुरात पार पडलेल्या देशपातळीवरील अबॅकस स्पर्धेत केज येथील ब्रिलियन्स अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सिद्ध करत मोठे यश मिळवले! राष्ट्रीय स्तरावर एकूण 9 विद्यार्थी निवडले गेले होते, मात्र वय लहान व प्रवास दुर असल्याने 3 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत क्लासचे नाव उज्ज्वल केले.दुर्वा दिलीप अंधारे हिने तिसरा क्रमांक पटकावत ब्राँझ मेडल जिंकले! दक्ष विजया काळे आणि मैथिली दिलीपराव अंधारे यांनी पाचवा क्रमांक पटकावला! ही स्पर्धा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि इतर 7 राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये झाली, ज्यामध्ये ब्रिलियन्स अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल क्लासच्या संचालिका सौ. वनिता दिलीपराव अंधारे यांचे तसेच विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. संपूर्ण ब्रिलियन्स अबॅकस क्लासेसच्या चमूला सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा देत त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.