Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केज मध्ये” न्यायाच्या” लिलावाचे आणि “अन्यायाच्या” धुलवडीचे फोटो आणि विडिओ व्हायरल! संशयित आरोपी आणि न्यायमूर्तीच्या “सहधुलवडी”ने केजची न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज मध्ये” न्यायाच्या” लिलावाचे आणि “अन्यायाच्याधुलवडीचे फोटो आणि विडिओ व्हायरल!

संशयित आरोपी आणि न्यायमूर्तीच्या “सहधुलवडी“ने केजची न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात.      केज : न्यायव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी न्यायदेवतेच्या रूपातून माननीय न्यायाधीशांची असतानाच अलीकडे आपल्या न्यायदातात पदाचे पावित्र्य विसरून न्यायव्यवस्थेचा न्यायदाताच आपली जागा सोडून कर्तव्य धर्म डळमळीत करत असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच संपूर्ण देशभर गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील केज मकोका न्यायालयाचे विशेष जिल्हा व सत्र न्यायमूर्ती हे आपल्या खाजगी निवास नगरीमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित आणि शक्तीच्या रजेवर पाठवलेल्या दोन संशयित आरोपी सोबत धुळवडीचा रंग उधळत असल्याचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत शंका ट्विट करत माननीय न्यायमूर्तींच्या संशयित आरोपी  सोबतच्या रंग उधळणीवर आरोप केल्याने न्याय आणि गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात संबंधित माननीय न्यायमूर्तीसमोर अनेक महत्त्वाचे आणि मोठमोठे खटले चालू असल्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याप्रमाणे निर्माण झालेल्या संशयाप्रमाणेच इतर खटल्यांच्या कामकाजाबाबत देखील मोठा संशय निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसकर्मचारी या प्रकरणाची पहिली सुनावणी घेतलेल्या न्यायाधीशांसोबत रंगांची उधळण केल्याचा दावा समोर आला आहे. देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांसोबतच या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या आणि निलंबित पोलिसांनी धुळवड खेळल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.अंजली दमानिया यांनी दोन निलंबित पोलीस अधिकारी आणि न्यायाधीशांचा रंगपंचमी साजरा करतानाचा फोटो ट्विट केला आहे. फोटो तपासा आणि अधिक खात्री करा, असंदेखील अंजली दमानिया फोटो शेअर करताना म्हणाल्या आहेत. दरम्यान, दमानिया यांनी ट्विट केलेल्या फोटोची “पाठलाग न्यूज ” पुष्टी करत नाही. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी माध्यमांनादेखील प्रतिक्रिया दिली आहे.अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आसताना आज धुलवडीला केज मधील साई नगर येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुलवडीच्या सप्त रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसले. विशेष म्हणजे या दोघांनी संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी घेणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले हे साई नगर केजमध्येच राहतात. ते या हत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्यांसोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत. आता न्यायाधीशांचे जर आरोपीनां वाचवणारे हे निंलबित आधिकारी यांच्यासोबत केस चालू असताना, न्यायमूर्ती होळी खेळत असतील तर हे चुकीचे आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.”विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला जी बैठक झाली, त्या बैठकीत सगळेच्या सगळे कट करणारी लोकं उपस्थित होती. त्यांच्याबरोबर तिथे उपस्थित राहणारे अधिकारी होते तत्यातील हे राजेश पाटील आणि पीआय प्रशांत महाजन असे हे दोन व्यक्ती जेव्हा न्यायाधीशांसोबत दिसतात तेव्हा हे चुकीचं आहे. माझी अशी मागणी आहे की, यापुढे ही जी सुनावणी आहे, ती या न्यायाधीशांकडून काढून घ्यावी, अशी मागणी न्याय व्यवस्थेकडे करणार आहे. तसेच प्रिन्सिलपल जज यांच्याकडेही करणार आहे. संबंधित न्यायाधीशांकडून खटला काढून घेऊन दुसऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची विनंती मी करणार आहे”, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिलीआहे. या प्रकारामुळे मात्र न्याय आणि गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये