शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय पाटील यांचा नातू आणि मा. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्यावर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल.

शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय पाटील यांचा नातू आणि मा. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्यावर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल.
क्राईम : सुप्रसिद्ध शिक्षण सम्राट तथा ज्यांच्या ट्रस्टचे स्वतःचे विद्यापीठ स्थापन झालेले आहे असे शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय पाटील यांचा नातू आणि माझी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पुतण्या पृथ्वीराज संजय पाटील याच्यावर ठाणे येथील कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपीने आपल्याच विद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीच्या बाबतीत हे कु- कृत्य केल्याचा तसेच, अन्यायग्रस्त 29 वर्षीय तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आणि जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केला आहे.
सदर तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार पोक्सो कायद्याखाली बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी आणि आरोपी पृथ्वीराज पाटील यांची मागील एक वर्षांपासून ओळख झाली होती. या तरुणीने ठाणे, नवी मुंबई आणि कोल्हापुरातील बंगल्यावर लग्न करण्याचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा पृथ्वीराज पाटील याच्यावर आरोप केला आहे.
तसेच, धमकावून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.या प्रकरणी पीडितेने 7 मार्चला कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या सर्व आरोपांनी राज्याच्या राजकारणात तसेच शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पृथ्वीराज संजय पाटील हे डॉ. डी.वाय पाटील ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत. याप्रकरणी पीडितेकडून ज्या रुग्णालयात गर्भपात करण्यात आला त्या रुग्णालयाचा अहवाल आणि चॅटिंगचा पुरावा, तसेच काही फोटोज पोलिसांकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत काही मीडिया रिपोर्टमध्ये ही दावा करण्यात आला आहे. आज पर्यंत केवळ शिक्षण, राजकारण आणि प्रशासनात डॉ. डी.वाय. पाटील ट्रस्टच्या माध्यमातून प्रगतीचा उंच उंच रचलेला गगनभेदी मनोरा पृथ्वीराज पाटलांच्या गुन्हेगारीच्या माध्यमाने एका क्षणात जमीनदोस्त झाल्याच्या भावना राज्यभर व्यक्त करण्यात आल्या आहेत.