जागतिक महिला दिना निमीत्त पञकारांसह सौभाग्यवतीचा सत्कार ही कौतुकास्पद बाब. नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड.
केज/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य पञकार संघ,मुंबई शाखा केज व जनविकास परिवर्तन आघाडी केज यांच्या संयुक्त विद्यमाने दि.८मार्च रोजी शनिवारी हाॕटेल गुरुमुख येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पञकार बांधव व पत्रकारितेत त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतीचा सहृदय सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड या होत्या.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अंकुशराव इंगळे,जन विकास परिवर्तन आघाडी चे प्रमुख श्री.हारुणभाई ईनामदार, केज चे गटशिक्षण अधिकारी श्री.लक्ष्मणराव बेडसकर,नगरसेविका पदमीन अक्का शिंदे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.शिवाजी दादा ठोंबरे,भाजपा युवा नेते प्राचार्य श्री.राहुल भैय्या गदळे,शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई शिवदास मुंडे,सौ.वैशालीताईसांगळे,सामाजिक कार्यकर्त्या अॕड.अनिताताई मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली.महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन स्व.सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी केज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.अंकुशराव इंगळे यांनी जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांना स्ञिरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल बनसोड यांचे अभिनंदन करुन केज नगर पंचायत करीत असलेल्या विकास कामाबद्धल समाधान व्यक्त केले.जनविकास परिवर्तन आघाडी प्रमुख श्री.हारुणभाई ईनामदार यांनी आपल्या शेरोशायरी तुन आपल्या भाषणातुन आपण ईनामदार आहोत. केज शहराच्या विकासा साठी सर्व पक्षाकडे मागणी करण्यासाठी तत्पर असल्याचे सुतोवाच केले.
अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांनी जागतिक महीला दिनाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्र राज्य पञकार संघ मुंबई शाखा केजच्या पञकारबांधवांनीपञकार बांधवांच्या सौभाग्यवती यांचा सत्कार समारंभ आयोजित केला हा उपक्रम उल्लेखनीय असुन पञकार बांधवां च्या यशामागे त्यांच्या सौभाग्यवतींचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. महीला या उत्तम व्यवस्थापक असुन सर्व क्षेत्रात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच सर्व स्तरातुन प्रगती करत राष्ट्रनिर्माण कार्यात हिरीरीने सहभागी आहेत. हिंदू कोड बिलामुळे महिलांना समानतेचा अधिकारमिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात सौरत्नमाला ताई मुंडे, एडवोकेट अनिताताई मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रकांत पाटील यांनी केले तर सुञ संचालन श्री.रमाकांत ढाकणे यांनी केले.आभार प्रदर्शन श्री.पांडुरंग कसबे यांनी मानले.स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी महिला भागिनी,पञकार बांधव व विवीध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.