क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाटोदा पोलीस कर्मचाऱ्याच्या ‘लैंगिक हल्ल्याने’ पुन्हा बीड जिल्ह्याला कुप्रसिद्धीचा हादरा!! नराधम पोलीस कर्मचाऱ्याला जागतिक महिलादिनाचाही विसर!!!

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

पाटोदा पोलीस कर्मचाऱ्याच्या ‘लैंगिक हल्ल्याने’ पुन्हा बीड जिल्ह्याला कुप्रसिद्धीचा हादरा!!

 

पोलीस आमदार, उद्धव गडकर. नराधम पोलीस कर्मचाऱ्याला जागतिक महिलादिनाचाही विसर!!!

बीड: बीड जिल्ह्यातील मानव जातीतले बहुतांश प्राणी हे हिंस्त्र आणि पशुतुल्य वागत असल्याचा सर्वत्र आरोप होत असतानाच मानव जातीच्या हक्क आणि कायद्याचा संरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोदा पोलीस ठाण्याच्या एका ठाणे अंमलदाराने जागतिक महिला दिनाचे औचित्ते साधत एका 24 वर्षी महिलेला पोलीस ठाण्यामार्फत सत्काराचे निमंत्रण देऊन पोलीस ठाण्यात बोलावून घेत तिला मोटरसायकलवर घेऊन जाऊन एका निर्मनुष्य परिसरातील खोलीत तिच्यावर ऐन जागतिक महिला दिनाच्या दिवशीच तिच्यावर पाश्वी बलात्कार केल्याची महाभयंकर घटना घडली असून, पोलीस खात्यात एका लोकसंरक्षकाच्या भूमिकेतील पोलिसानेच भक्षक बनून हे भयानक, निंदनीय आणि काळेकुट्ट कृत्य केल्याने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलिसांकडून समोर आलेली माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील एका ग्रामीण भागात रहिवासी असलेली महिला सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. मागील काही काळापासून काही संबंधित प्रकरणात सदर महिलेचे पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. यानिमित्ताने दोघांच्याही मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली, यातूनच त्यांच्यात संभाषण आणि मेसेज आदींची देवाण-घेवाण चालू होती. नेमका यांच संधीचा लाभ घेत बीट अंमलदार उद्धव गडकर यां कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले होते.ती महिला पाटोद्यात आली असता उद्धव गडकर यांने तिला स्टेट बँक च्या बाजूला घेऊन जात सदर महिलेवर बलात्कार केला. यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उद्धव गडकर याने सदर महिलेवर बलात्कार केला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येवून स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या समोर फिर्याद दाखल केली आहे. देशभर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र होतकरू महिलांचे सत्कार चालू असताना सदरची पिढीता मात्र पाटोदा पोलीस ठाण्याचा बीट अंमलदार उद्धव गडकर यांच्या दुष्कृत्या मुळे दुपारी १ वाजल्यापासून पाटोदा पोलीस ठाण्यातच बसून होती. घटनेचे गांभीर्य ओळखून बीडचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात तडका फडकी भेट देत तपासा संदर्भात सुचना केल्या. संध्याकाळी ६-३० सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठविण्यात आले आहे. आणि नराधम उद्धव गडकर या पोलीस कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा क्र 77/25 भा.द.वी 64/2-A (1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत. या भयाणक घटनेच्या निमित्ताने बीड जिल्हा पुन्हा एकदा कुप्रसिद्धीचे हादरे घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये