ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आदित्य (दादा) पाटील यांची काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड. राज्यातील तमाम युवा कार्यकर्त्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

आदित्य (दादा) पाटील यांची काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड.

राज्यातील तमाम युवा कार्यकर्त्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव!

केज/प्रतिनिधी: काँग्रेसचे युवा नेते तथा केज नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष श्री आदित्य अशोकराव पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांना मानाचे स्थान मिळाले असून,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते आदित्य पाटील मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे सक्रिय पदस्थ तथा संघटनात्मक काम करत आहेत. आदित्य पाटील यानी केज नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद भूषवले आणि,उपनगराध्यक्ष पदावर देखील दमदार काम केले असल्याचा ईतिहास आहे. विद्यमान नगरसेवक पदावर काम करताना नगरपंचायत च्या माध्यमातून केज शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आदित्य पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांचा बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्रियपणे सहभाग आहे.

सदभावना पदयात्रेने सामाजिक सलोखा जपला.
बीड जिल्ह्यातील सामाजिक घडी विस्कटली होती.त्यावेळी आदित्य पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून सदभावना रॅलीच्या माध्यमातून केस तालुक्यातील मस्साजोग ते बीड पदयात्रा काढली. या पदयात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः पदयात्रेत पायी चालले. पदयात्रेत राज्यभरातून हजारो पदयात्री सहभागी झाले होते. सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रामध्ये यानंतर विविध ठिकाणी पदयात्रा काढण्यात आल्या. पदयात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचा आणि दोन समाजातील तेढ दूर करण्याचा प्रयत्न प्रस्तुत पदयात्रेतून करण्यात आला होता. न्यायासाठी सरकारला धारेवर धरण्यात आले होते.
काँग्रेसने काढलेल्या पदयात्रेचे राज्यभर कौतुक झाले होते.
———– युवा नेते आदित्य पाटील यांना माजी मंत्री अशोकराव पाटील व खा रजनीताई पाटील यांचा राजकिय वारसा लाभलेला आहे. केवळ वारसा मिळाला म्हणून नाही तर, एक अभ्यासू राजकिय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. गांधीवादी विचार घेऊन अत्यंत संयमाने राजकारणाबरोबर समाजकारण करणारे आदित्य पाटील असा त्यांचा लौकिक आहे.

नगराध्यक्ष पदावर काम करताना विकासात्मक दृष्टिकोन ठेवून यशस्वीरित्या कार्य केले आहे.
युवकांचे आयकॉन युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष पदावर काम करताना जिल्हाभरातील युवकांना सोबत घेऊन युवक काँग्रेसचे संघटन उभे केले. आदित्य पाटील हे कार्य निष्ठेमुळे निष्ठावान कार्यकर्ता ते युवकांचा आयकॉन बनले आहेत. ——————– सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करणारे युवा नेतृत्व म्हणून आदित्य पाटलांची ओळख आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाटील हे तत्पर असतात. त्यांनी कधीही अडवाआडवीचे राजकारण केलेले नाही. बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक चळवळीतही आदित्य पाटील अग्रेसर राहिलेले आहेत.काँग्रेस पक्ष बांधणी यामध्ये पाटील यांचे मोठे योगदान आहे या कार्याची दखल घेऊन त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे खासदार रजनीताई पाटील आणि माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युवक काँग्रेसमध्ये असताना मोठ्या प्रमाणावर पक्षाची संघटनात्मक बांधणी केलेली आहे. सदर कार्याची दखल घेऊन काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली. यापुढील काळामध्ये काँग्रेस पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आले बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, नूतन प्रदेश चिटणीस गणेश राऊत, उप नगराध्यक्ष पशुपतिनाथ दांगट, नवनाथ थोटे, रमेश पाटील, प्रवीणकुमार शेप यांच्यासह अनेक मान्यवरांनी, पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये