ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

केज अंबाजोगाई विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर माजी आमदार संगीता ठोंबरे यांची जबरदस्त एन्ट्री! गोपीनाथ गडाच्या आशीर्वादाने उद्या संगीता ताई अर्ज भरणार!!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज अंबाजोगाई विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर माजी आमदार संगीता ठोंबरे यांची जबरदस्त एन्ट्री!

गोपीनाथ गडाच्या आशीर्वादाने उद्या संगीता ताई अर्ज भरणार!!

प्रतिनिधी /केज : मागच्या अनेक वर्षांपासून अदम प्रवृत्तीच्या मगर मिठीत अडकलेला आणि विकास शून्य होऊन भकास झालेला केज- अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघ ‘मगर -मिठी’ मुक्त करण्यासाठी माजी आमदार संगीता ताई ठोंबरे या विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर उतरण्याच्या पूर्ण तयारीत असून, उद्या सोमवारी त्या असंख्य समर्थकांना सोबत घेऊन मोठ्या शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तेच तेच कारभारी,पुन्हा तेच नेते आणि नेहमीचेच कार्यकर्ते, या परिस्थितीला केज- अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातला मतदार आता मात्र जाम विटून गेलेला आहे. नेहमीचाच हिंस्र व अदमस्तित आवाज, नेहमीचेच गुत्तेदार आणि विकासातली टक्केवारी आणि आपापसात मतभेद निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याची प्रवृत्ती, अशा प्रकारची  केज मतदार संघात निर्माण केलेली परिस्थिती कायमची संपवण्यासाठी विकासाचे व्हिजन हाती घेऊन केज अंबाजोगाई मतदार संघाच्या कुरुक्षेत्रावर माजी आमदार संगीता ताई ठोंबरे या दमदार एन्ट्री  करत असून, त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आहेत. माजी आमदार संगीता ताई ठोंबरे या उद्या सोमवारी असंख्य समर्थकांसह शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे. माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या पाठीशी सुप्त महाशक्ती सज्ज झालेली असल्यामुळे त्यांच्या अपक्ष परंतु अनेक पक्ष व असंख्य  मतदारांचा गुप्त पाठिंबा असलेल्या उमेदवारीमुळे केज अंबाजोगाई मतदारसंघात एक आगळावेगळा इतिहास घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये