Breaking Newsक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“हनीट्रॅप” च्या चक्रव्यूहातून सही सलामत निसटलेला केज गटशिक्षण कार्यालयातील कार्यरत प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर बाल लैंगिक अत्याचारात अडकला!

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

“हनीट्रॅप” च्या चक्रव्यूहातून सहीसलामत निसटलेला केज गटशिक्षण कार्यालयातील कार्यरत प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर बाल लैंगिक अत्याचारात अडकला!

केज : भ्रष्टाचार, अपहार, गैरप्रकार व अनैतिक प्रकाराच्या बाबतीत नेहमीच वादग्रस्त व चर्चेत असलेला आणि जुलै ऑगस्ट 20 -25 मध्ये चर्चेला उधान आणणाऱ्या “हनीट्रॅप “च्या चक्रविहातून सही सलामत निसटलेला केज गटशिक्षण कार्यालयातील कार्यरत प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये तथा अल्पवयीन मुली सोबत गैरप्रकार केल्यावरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज पंचायत समिती अंतर्गत गटशिक्षण कार्यालयात कार्यरत असलेले प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी” महाराष्ट्र शासन” अशी पाटी लावलेल्या आपल्या कार मध्ये बसवून सदरच्या अल्पवयीन मुलीला गाडीत बसवून तिच्याशी गैरवर्तन, बॅड टच व लैंगिक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्राला काळ्याकुट्ट अंधारात टाकणारी घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी केज गटशिक्षण कार्यालयाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी तिच्या भावाचा वाढदिवस असल्याने ती मुलगी, आई व भावासह मानलेली मावशी माया यांच्या घरी गेली होती. त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पीडित मुलगी तिची मानलेली मावशी माया व तिची ६ वर्षांची मुलगी असे तिघे केक आणण्यासाठी बीड परळी रोडवरील चाटे हॉस्पीटल समोरच्या बेकरीच्या दुकानावर आले होते.

यावेळी माया मावशीच्या ओळखीचा गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हा त्याची महाराष्ट्र शासन अशी पाटी लावलेली स्विफ्ट कार घेऊन त्या ठिकाणी आला. त्याने माया मावशीकडे इशारा करत “चहापाणी नाष्टा करूया” असे सांगून पीडित मुलगी, तिची मावशी माया व तिची ६ वर्षांची मुलगी यांना गाडीत बसवले. गाडीत बसवल्यानंतर बेडस्कर याने आपली कार धारूर चौकातून चिंचपूरमार्गे कोल्हेवस्ती रस्त्यावर अंधाऱ्या जागेत निर्जन स्थळी थांबवली . गाडी थांबवून बेडस्कर यांनी पीडित मुलीच्या हाताला धरून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना बॅड टच करत पीडित मुलीला ओढण्याचा प्रयत्नही केला. यावेळी पीडित मुलगी, तिची मावशी व लहान मुलगी यांनी आरडाओरड केली असता, “ओरडल्यास मारून टाकीन” अशी धमकी देण्यात आली.

घटनास्थळी योगायोगाने आणखी एक कार आली. अनाहूतपणे आलेल्या सदर कारच्या उजेडाची संधी साधून बेडसकर गाडीमधून पळून गेला. अनाहूतपणे आलेली सदरची कार ही पीडित मुलीची आई व उसतोड मुकादम बाळू साठे यांची असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे . बीड परळी रोड वरून पीडित मुलीला व इतरांना बेडस्कर यांच्या गाडीतून जाताना योगायोगाने बाळू साठे यांनी पाहिल्याने बाळू साठे यांनी त्याच क्षणी मुलीच्या आईला फोन करून माहिती दिली होती आणि त्यामुळे कोल्हेवाडी मार्गावरील घटनेच्या निर्जन स्थळी वेळेवर पोहोचल्यामुळे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर याला रंगी हात पकडल्यामुळे प्रकार उघडकीस आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या भयानक व शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या आणि समाज मनाला शून्न करणाऱ्या लक्ष्मण बेडसकरच्या समोर आलेल्या काळ्याकृत्या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३मधील कलम ७४, ७५(१), ७५(२), ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ८ व १२ अंतर्गत लक्ष्मण बेडसकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला आहे. प्रकरणाचा तपास प्रकाश शेळके हे पोलीस अधिकारी करीत आहेत. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये