क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक हजाराची लाच आणि तीन वर्षाचा कारावास.

पाठलाग न्युज:

   एक हजाराची लाच आणि तीन                  वर्षाचा कारावास.                                                                                                                                                        लातूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रांक दस्तची नोंदणी करुन देण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला लातूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी सोमवारी तीन वर्षांचा कारावास व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील विठ्ठल देशपांडे यांनी सांगितले, तक्रारदाराने १३ डिसेंबर २०१६ रोजी अहमदपूर एमआयडीसीकडून भाडेपट्टा करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे दस्त अभिनिर्णयासाठी दाखल केला होता. दरम्यान, स्टॅम्प ड्यूटी भरुन दस्त लातूर एमआयडीसी कार्यालयात सादर करायचा होता. तक्रारदाराने रीतसर लागणारी स्टॅम्प ड्यूटी चलनाद्वारे भरली होती. भरलेली पावती जमा करुनही दस्त देण्याच्या कामासाठी जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विष्णू तुळशीदास काळे (वय ३४) याने त्यांच्याकडे एक हजाराच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ५ जानेवारी २०१७ रोजी पथकाने सापळा लावला. पंचासमक्ष एक हजाराची लाच घेताना कनिष्ठ लिपिक काळे याला पकडले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास करुन लातूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. युक्तिवाद, साक्ष आणि दाखल सबळ पुरावे महत्वपूर्ण ठरले. सुनावणीअंती दोषी ठरलेल्या लिपिक विष्णू काळे याला न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी तीन वर्षांचा कारावास, पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली या खटल्यामध्ये सरकारच्या पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील विठ्ठल व्ही. देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक वकील परमेश्वर तल्लेवाड यांनी सहकार्य केले. लातूर एसीबीचे. पोलिस उपाधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी पो.नि. अन्वर मुजावर, अंमलदार भावत कटारे, असलम सय्यद, फारुक दामटे, भीमराव आलुरे यांनी केली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये