ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फेसबुकी कार्यकर्त्यामुळे राजकीय नेत्यांचे व राजकीय पक्षांचे मोठे नुकसान. फेसबुकी कार्यकर्त्यांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

पाठलाग न्युज/परमेश्वर गित्ते:

फेसबुकी कार्यकर्त्यामुळे राजकीय नेत्यांचे व राजकीय पक्षांचे मोठे नुकसान.

फेसबुकी कार्यकर्त्यांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?—————————————-                                         बीड: सध्या जागतिक स्तरावर समाज माध्यम अधिक प्रभावी झाले आहे. समाज माध्यमाची गतिमानता वाढली असून एक मोठी जागतिक क्रांती या निमित्ताने झाली आहे.जागतिक स्तरावरची घडामोड किंवा बातमी चुटकीसरशी आपणास पाहायला व ऐकायला मिळते. समाज माध्यमांच्या आहारी तरुण पिढी व तुम्ही-आम्ही गेलो आहोत.शिवाय कुठलीही घटना व प्रसंग क्षणात वाऱ्यासारखी पसरली जाते. बातमी खरी असो की खोटी ती जलद गतीने व्हायरल होते. याचा सर्वाधिक फटका हा राजकीय नेत्यांना व त्यांच्या राजकीय पक्षांना होत आहे. महाराष्ट्र असो किंवा बीड जिल्ह्यात समाज माध्यमांचा फटका हा येथील नेत्यांना व पक्षाला बसला आहे. स्मार्ट युगात ‘ फिल्ड ‘ वरील कामे लुप्त पावत चालले आहेत. सारी दुनियाच सोशल मीडियावर अक्टिव्ह आहे.सोशल मीडिया हे तसेच चांगले व प्रभावी माध्यम आहे सोशल मीडियाचे फायदे अनेकांना झाले आहेत घर सोडून गेलेले भाऊ असतील किंवा शालेय जीवनातून दूर गेलेले वर्गमित्र असतील त्यांना एकत्र आणून एका धाग्यात बांधण्याचे काम सोशल मीडियाने केले आहे मात्र हाच सोशल मीडिया राजकीय नेत्यांची व पक्षाची डोकेदुखी बनला आहे विशिष्ट नेत्याकडून त्याबद्दल व पक्षाबद्दल फेकण्याची जलद गतीने पसरविला जातो त्याचा फटका नेत्याच्या प्रतिमेला व नेतृत्वाला बसत आहे चुकीची गोष्ट लवकर व्हायरल होत असते हा सर्वश्रुत नियम आहे तरी देखील एडिटिंग करून चुकीचा संदेश पसरविला जातो. बीड जिल्हा सुद्धा त्याला अपवाद नाही आ. पंकजाताई मुंडे यांच्या सारखे अष्टपैलू नेतृत्व हे याच सोशल मीडियामुळे दुर्लक्षित झाले आहे होते समाज माध्यमात सातत्याने त्यांच्या विषयीच्या कल्पकल्पात बातम्या पेरल्या जायच्या.ज्यामुळे पक्षात व पंकजाताईंमध्ये दुरावा होत गेला. फेसबुक वापरणारे कार्यकर्ते व पदाधिकारी हे कुठल्याही घटनेची वास्तवाची माहिती न घेता केवळ आपल्याकडे ‘ आलीय ‘ म्हणून शेअर केली जाते. ज्याचा परिणाम अनेकांना भोगाव लागतो. याच सोशल मीडियाचा फटका आ.पंकजाताई मुंडे यांना सातत्याने फटका बसला आहे. पंकजाताई कधीही,कुठेही म्हणाल्या नाहीत की, ‘ मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे ‘ हे विधानबीड येथे एका कार्यक्रमात संचलन करणाऱ्या निवेदकाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काढले.तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आ. पंकजाताईंबद्दल सल आहे ती सल बोलून दाखवत नसले तरी अप्रत्यक्षपणे कृतीतून दिसून येते. अनेक कार्यक्रम झाले, मेळावे झाले, पत्रकार परिषदा पार पडल्या. आ.पंकजाताई मुंडे जो आशय घेऊन बोलल्या तो आशय सोडून बातम्या रंगवण्यात सोशल मीडिया दंग असतो. याचा परिणाम पंकजाताईंना सातत्याने भोगावा लागला आहे. शिवाय पंकजाताई समर्थक कार्यकर्ते व पदाधिकारी हे सुद्धा सोशल मीडियावर व विशेषतः फेसबुकवर व्यक्त होतात त्यांच्याही काही कमेंट या नक्कीच कुणाला तरी न्याय मिळवून देण्यासाठी असतात. तर काही पोस्ट या खूपच उग्र स्वरूपाच्या असतात. त्याचाही विचार होणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर सर्वत्र चांगला पण होतोय आणि दुरुपयोग पण होतोय. ज्यातून नेत्यांचे हित साधले जाईल, ज्यातून समाजहीत साधले जाईल याचा विचार करण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा धुमाकूळ सर्वत्र पाहायला मिळतो आहे. सर्वत्र घाणच आहे असे नाही तर काही चांगल्या गोष्टी पण घडताना दिसून येतात. कार्यकर्त्यांना आपले नेतृत्व,त्यांचा पक्ष सकारात्मक विचारातून कसा मोठा होईल आणि त्याद्वारे कसे सामाजिक साधले जाईल याचा विचार नक्कीच या वेळोवेळी होण्याची गरज आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये