पिकअप चा सराईत चोरटा दोन पिकअपसह लातुर जिल्हयातुन पकडला.
केज पोलीसांची मोठी कारवाई!!
केज: वाहन चोरीचे स्तोम सर्वत्रच वाढलेले असतांनाच दोन पिकअप चोरीला गेल्याच्या घटणा केज पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तात्काळ तपासानंतर केज पोलीसांनी दोन्ही पिकअपसह सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस स्टेशन केज येथे गुरनं.387/2024 कलम 303(3) बीएनएस व गुरनं.394/2024 कलम 379 प्रमाणे पिकअप चोरीचे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हे दाखल होते. पोलीस स्टेशन केज व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केज येथील कर्मचारी हे नमुद गुन्हयात चोरी गेलेले दोन पिक अप चा शोध घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी गेलेले पिकअप हे लातुर जिल्हयात असल्याची माहिती मिळाल्यावरुन केज उपविगाचे सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मीना व केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्ष प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शनाखाली तपासी पथक तयार करुन आरोपीचे शोध कामी रवाना केले होते. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयातील आरोपीतास लातुर जिल्हयातील रेणापुर येथुन सदर गुन्हयातील आरोपी नामे मुसेफ अब्दुल रहिम कुरेशी, वय 19 वर्षे, रा. सराई गल्ली बसवेश्वर चौक, रेणापुर ता, रेणापुर जि. लातुर यास ताब्यात घेवुन सदर आरोपीताकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेले 1) TATA ACE कंपनीचे 4,50,000/-रुपये किंमतीचे व 2) महेंद्रा कंपनीचे 2,00000/- रुपये किंमतीचे पिकअप जप्त केले आहे.सदर गुन्हयातील एकूण रु. 6,50,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती केज पोलिसांकडून देण्यात आली आहे. गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपीतास मा. न्यायालयाने दिनांक 20/07/2024 पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. सदरची कार्यवाही ही मा. श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक, बीड, मा. श्रीमती. चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मीना व केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे आदेशान्वये पोउपनि राजेश पाटील, पोना/दिलीप गित्ते, पोह/उमेश आघाव, पोह/बाळासाहेब अहंकारे, पोअं/ रशिद शेख, पोअं/संतोष गित्ते यांचे पथकाने केली आहे.केज पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्रस्तुत कारवाई बद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.