ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मूळ कार्यकर्ता वर्ग जमात झाली अस्तित्व शून्य. —————————————- *गुत्तेदार कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका कशा जिंकल्या जातील?* —————————————- केवळ मुंडके घेऊन फिरल्याने विजयी होता येणार नाही? —————————

पाठलाग न्युज/परमेश्वर गित्ते:

मूळ कार्यकर्ता वर्ग जमात झाली अस्तित्व शून्य.

—————————————- गुत्तेदार कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका कशा जिंकल्या जातील?————-————————— केवळ मुंडके घेऊन फिरल्याने विजयी होता येणार नाही? —-———————-

अंबाजोगाई:सध्याच्या काळातील राजकारण पूर्णतः बदललेले आहे.तळमळ असणारा नेता राहिला नाही किंवा कार्यकर्ता ही राहिला नाही. तंत्रज्ञानाच्या काळाप्रमाणे सर्वांचीच झपाट्याने प्रगती होत आहे.जसा नेता या पक्षातून त्या पक्षात कधी गेला हे कळत नाही तसा कार्यकर्ता सुद्धा मागच्या मागे कधी निघून गेला हे सांगता येत नाही. सध्या फक्त मुंडक्यांचा जमाना आहे.पूर्वी कार्यकर्ता व नेता यांच्याविषयी प्रचंड आदर होता. पण आता कार्यकर्ता हा केवळ गुत्तेदारीच्या ‘ लॉलीपॉप ‘ पुरताच मर्यादित राहिला आहे. कोणाही कार्यकर्त्यांच्या पाठीशी साधं सुद्धा फिरायला तयार नाही. मग अशा गुत्तेदार कार्यकर्त्यांच्या बळावर नेते निवडणुका जिंकणार तरी कशा? असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्याचा काळ खूप नाजूक आणि अस्थिर आहे. कार्यकर्ता जमात ही नामशेष झाली असून ती जमात आता गुत्तेदारीत ‘ कनव्हर्ट ‘ झाली आहे. पूर्वी गुत्तेदारी करणारा ठराविक वर्ग होता.ज्यांच्याकडे प्रचंड पैसा होता तीच मंडळी गुत्तेदारी करत होते. मात्र 1995 सालापासून गुत्तेदारीचे व राजकारणाचे चित्र बदलून गेले. तत्कालीन युती सरकारने कार्यकर्त्यांना आर्थिक बळ देऊन सक्षम करण्याचा निर्णय घेतला व तसे धोरण राबवले.सन 1995 च्या काळापासून मागे मागे फिरणारा कार्यकर्ता हा गुत्तेदार झाला. गुत्तेदारीमुळे कार्यकर्त्यात आमुलाग्र बदल झाला. सत्तापालट झाला की कार्यकर्ता सुद्धा धाडकन पक्ष बदलू लागला. गुत्तेदार कार्यकर्त्याचा पक्ष हा सत्ताधारी पक्ष हा बनला. त्यामुळे तत्वनिष्ठा, ध्येय, धोरण, विचारधारा या गोष्टी आपसूकपणे बाजूला फेकल्या गेल्या. गेल्या 30 वर्षात कार्यकर्ता वर्ग संपला आणि गुत्तेदार कार्यकर्ता जोमात आला.आता त्यालाच सर्वाधिक भाव व किंमत आहे. आणि तोच सत्तेच्या सारीपाटावर खेळतो आहे. यामुळे राजकीय संघटन संपुष्टात आले.’ व्हावचर सिस्टीम ‘ कार्यकर्त्यांमुळे राजकारणाचे व समाजकारणाचे वाटोळे झाले.जो विचार घेऊन कार्यकर्ता काम करत होता तो वर्ग आता दिसत नाही. पूर्वी माकप, भाकप, शेकाप,काँग्रेस, शिवसेना, भाजप ही विचारधारा असलेली माणसं प्रभावी आणि आक्रमक होती.आता ती पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या निवडणुकीत जो नेता ज्या पक्षाकडून लढला तो यावेळी त्याच पक्षाकडून लढेल का?असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या कार्यकर्त्यांचे संघटन व नेतृत्व पाहिले तर कुचकामी दिसून येत आहे.अशा कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणुका लढवणे व जिंकणे आव्हानाचा काम आहे.याचा प्रत्यय नुकताच लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे. गुत्तेदार कार्यकर्ते जोमात होते मात्र उमेदवार कोमात घालण्याचे काम या गुत्तेदार कार्यकर्त्यांकडून झाले. गुत्तेदारी करणारी जमात कधीच नेता होऊ शकत नाही. कारण ते स्वार्थी आणि अप्पलपोटे असतात. अशांच्या जीवावर निवडणुका लढणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखेच आहे. अंबाजोगाई शहरात याच गुत्तेदार कार्यकर्त्यांचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. गुत्तेदार कार्यकर्ते प्रचंड आत्मविश्वासात होते पण त्यांच्या नाकर्तेपणामुळे पुलाखालून कधी पाणी निघून गेले हे त्यांना व नेत्यांना सुद्धा कळले नाही. सध्या ज्याचे घरात काही चालत नाही ते गल्लीचे स्वयंघोषित कारभारी बनले आहेत. गेल्या निवडणुकीत हेच गुत्तेदार कार्यकर्ते दुसऱ्याची टिमकी वाजवत होते आणि आता तिसऱ्याची वाजवत फिरत असतात.सध्याचा काळ म्हणजे केवळ चमकोगिरीचा काळ आहे. नेत्याच्या पुढे-पुढे करणे आणि त्यांच्यासमोर खूप काम करतोय हे दाखवणे हेच त्यांचे काम आहे. गुत्तेदार कार्यकर्ता हा केवळ गर्दी जमवण्याच्याच कामाचा आहे. त्याच्यामुळे शहरात फार मोठे संघटन आहे किंवा शहरातील व परिसरातील वातावरण बदलेल असे अजिबात नाही. मतदारांनी सुद्धा यांना पुरते ओळखले आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी गुत्तेदार कार्यकर्त्यांच्या गुत्तेदार कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांच्या खांद्यावर विश्वासाने माना टाकून आत्मघात करून घेऊ नये. बस्स एवढेच या निमित्ताने सांगणे .

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये