परळीतील शासकीय विश्रामगृहाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण.
बीड:परळी वैद्यनाथ शहरात शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते आज झाले.बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील परळी वैद्यनाथ शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे आज जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी उपविभागीय दंडाधिकारी नम्रता चाटे, अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बी. एल. रूपनार, कंत्राटदार, अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते. परळी वैद्यनाथ येथे ज्योतिर्लिंग असून गणमान्य व्यक्तींचा सतत दौरा असतो. यासह थर्मल पॉवर, विविध शासकीय कार्यालय असल्यामुळे येथील एकाच शासकीय विश्रामगृहावर ताण पडत होता. नवीन शासकीय विश्रामगृह उभारल्यामुळे हा ताण आता कमी होणार असून अद्यावत सुविधांसह हे विश्रामगृह बांधण्यात आले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.