प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी सेवानिवृत्त.
बीड / प्रतिनिधी: बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत पंडितराव कुलकर्णी हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल त्यांना सेवा गौरव समारोहात सपत्नीक सौ. रोहिणी श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर तसेच व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पाटकर, डायटचे प्राचार्य डॉक्टर विक्रम सारूक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, उपशिक्षणाधिकारी मैनाताई बोराडे, माजी उपसंचालक रवींद्र वाणी, मा. शिक्षणाधिकारी एन के देशमुख, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक बी.व्ही. तुपे, माजी शिक्षणाधिकारी आर.बी. लगड, माजी प्रशासन अधिकारी सुरज प्रसाद जयस्वाल, माजी शिक्षणाधिकारी सुसर, उपशिक्षणाधिकारी अजय बहिर, सेवानिवृत्त अधीक्षक मोहनराव शिरसाट, माजी शिक्षणाधिकारी पी डी चव्हाण, प्राध्यापक सर्जेराव काळे, त्याचबरोबर सेवा निवृत्त ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी हिरालाल कराड, गटशिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ऋषिकेश शेळके, श्रीमती गंगाखेडकर मॅडम, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभाग अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी, जेष्ठ पत्रकार नारायण नागरे, ज्येष्ठ संपादक दिलीप खिस्ती, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत रुईकर आदींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या कार्याचा”गौरव करण्यात आला.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.