‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभा मंडप उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ.
बीड : परळी वैद्यनाथ शहरात ‘शासन आपल्या दारी’ ची जय्यत तयारी सुरू असून आज कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभामंडप उभारणीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेऊन पाहणी केली.जनतेला शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ ही विशेष मोहीम राज्यभर राबविली जात आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होणार असून आज जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमास्थळी जाऊन पाहणी दौरा केला.या ठिकाणी उभारण्यात येणारा सभामंडप, स्टॉल्स,लाभार्थी यांची व्यवस्था या सर्वांबद्दल सर्वंकष चौकशी केली. कामाचा वेग वाढवण्याचे आदेश संबंधितांना दिले.या पाहणी दौऱ्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार वेंकटेश मुंडे, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, नायब तहसीलदार बी. एल. रुपनार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.