ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपने केजच्या जागेचा पुनर्विचार करून पप्पू कागदेंना उमेदवारी द्यावी अन्यथा जिल्ह्यात भाजपला धडा शिकवू ! केजच्या बैठकीत रिपाइं कार्यकर्त्यांचा एल्गार.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

भाजपने केजच्या जागेचा पुनर्विचार करून पप्पू कागदेंना उमेदवारी द्यावी अन्यथा जिल्ह्यात भाजपला धडा शिकवू !

केजच्या बैठकीत रिपाइं कार्यकर्त्यांचा एल्गार.

केज :- महायुतीने केजच्या जागे संदर्भात पुनर्विचार करून जागा रिपाइंचे नेते युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांना उमेदवारी देण्यात यावी. या मागणीसाठी रिपाइं कार्यकर्ते आक्रमक झाले असून जर पप्पू कागदे यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. तर भाजप आणि त्यांच्या उमेदवारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही. तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या मुद्द्याला हरताळ फासणाऱ्या मुंदडा परिवाराला राजकारणातून हद्दपार करू. असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आणि भाजप आणि त्यांच्या नेत्या विरुद्ध प्रचंड आक्रोश व्यक्त केला आहे. केज विधान सभेसाठी ना. रामदास आठवले यांनी पप्पू कागदे यांच्या नावाची घोषणा केलेली असताना देखील महायुतीने परस्पर उमेदवारी जाहीर करून मित्र पक्ष रिपांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा काम केले. या बाबत रिपाइं कार्यकर्त्यात प्रचंड प्रमाणात नाराजी आणि खदखद आहे. त्या निमित्त भाजपने त्यांच्या निर्णयाचा फेर विचार करावा अशी भावना व्यक्त केली. तसेच जर भाजपने त्यांचा निर्णय मागे घेतला नाही. तर जिल्ह्यात कमळ फुलणार नाही आणि फुलू देणार नाही. अशा तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पप्पू कागदे हे जनमानसातील नेतृत्व असून तळागाळातील सामान्य माणसांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी ते धावून जातात. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि राज्यात रिपाइंचे प्रचंड मोठी ताकद निर्माण झालेली आहे. वेगवेगळ्या मोर्चे सभा आंदोलने यांच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी असो की, गायारान हक्क परिषद यांच्या माध्यमातून सर्व समाजाला आणि अठरा पगड जाती धर्माला न्याय देण्याचे काम करीत आहेत. पप्पू कागदे एक.प्रामाणिकणे गेल्या अनेक वर्षा पासून करीत आहेत. केज मतदार संघाचे सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची अनेक वर्षा पासून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चा असताना देखील त्यांना डावलले असल्याने मतदार संघात भाजप विरोधात लाट निर्माण झाली आहे. पप्पू कागदे यांच्या समर्थनार्थ केज रिपाइं कार्यकर्त्यांनी केज तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक आयोजित केली होती. बैठकीला मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, राजेश सोनवणे, राहूल सरवदे, विकास अरकडे निलेश ढोबळे, दिलीप बनसोडे, गौतम बचुटे यांच्यासह हरेंद्र तुपारे दादाराव धेंडे, गोरोबा बनसोडे, गोरोबा बनसोडे, सूरज काळे, सुरेश गायकवाड, रोहित बचुटे, विनोद शिंदे, शिवाजी बनसोडे, हरीश गायकवाड, विनोद गायकवाड, रघुनाथ ढालमारे, रोहित कांबळे, मधुकर तुपारे, काकासाहेब कांबळे यांच्या तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. _____________________________________ नमिता मुंदडांना निवडणूक जड जाणार !:- मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यात आमदार मुंदडा यांची भूमिका रिपाइंचे विरोध यामुळे मुंदडा आणि भाजपला जड जाणार असल्याची लक्षणे दिसून येत आहेत. ———————————————————- कमळ हद्दपार करू कार्यकर्त्यांची भावना :- बैठकीला जमलेल्या कार्यकत्यांनी अत्यंत तीव्र शब्दात भाजपा आणि जिल्ह्यातील नेतांचा निषेध व्यक्त करून कमळ हद्दपार करू अशा भावना व्यक्त केल्या ——————————————————–— दलितांच्या प्रश्नावर आमदारांची भुमिका काय ? :- तालुक्यातील दलितांचे स्मशानभूमीचे प्रश्न, गायारान आणि मराठा व ओबीसी आरक्षण या बाबत त्यांची स्पष्ट भूमिका नसल्याने याचा त्यांच्या मतदानावर परिणाम होवू शकतो. ————-————————————————— पप्पू कागदे आश्वासक चेहरा :- पप्पू कागदे हे जिल्ह्यातील सर्वसमावेशक आणि आश्वासक नेतृत्व असून ओपन, ओबीसी, दलीत, मुस्लिम प्रवर्गातील त्यांना मानणारा प्रचंड वर्ग आहे. त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. ————————-————————-— ” भाजपने आम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळी केजची जागा देण्याचे आश्वासन देवून ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. याचा बदला घेवून आम्ही मुंदडा यांना हद्दपार करू.” — दिपक कांबळे, तालुकाअध्यक्ष, केज.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये