अपंगासाठी जीवनदान ठरलेल्या”जयपूर फूट” च्या कृत्रिम हात व पायांचे अंबाजोगाई मध्ये मोफत वाटप.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा स्तुत्य उपक्रम.
अंबाजोगाई: राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार “शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष” व “रामहरी राऊत सामाजिक प्रतिष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दि.७ /९/२०२४ रोजी अपंगांसठी जीवदानं ठरलेल्या जयपूर फूट चे अंबाजोगाई शहरात कृत्रिम हात व पापाय चे मोफत वाटप करण्यात आले असून, शिबीराचे उदघाटन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याधिकारी श्री मंगेश चिवटे यांचे हस्ते करण्यात आले तर, शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून र्हदयरोग तज्ञ डॉ. घुगे आणि नांदेड-हिंगोलीच्या महीला संपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई मुंडे या उपस्थित होत्या. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा मार्फत गेल्या महिन्याभरात शंभरहून अधिक दिव्यांग बांधवांनी नैसर्गिक किंवा अपघात होऊन गमावलेल्या हात किंवा पायाचे माप दिल्याची नोंद करण्यात आली होती, नोंद झालेल्या दिव्यांग बांधवांसाठी आंबेजोगाई शहरात शिबिराचे आयोजन करून मोफत कृत्रिम हात व पाय वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याजोगा होता. कुणाला गेल्या कित्येक वर्षापासून हात तर कुणाला पाय नव्हते, आज तेच हात-पाय पुन्हा मिळाल्याने पुनर्जीवन मिळाल्याची भावना यावेळी दिव्यांग बांधवांनी बोलून दाखवली.कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्रभर करत असलेल्या कामाचा आढावा श्री मंगेश चिवटे यांनी दिला. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील दिव्यांग बांधव किंवा कोणत्याही रुग्णाला कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले. सोबतच सरकार महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विविध योजना व उपक्रम राबवत असून सर्व नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असेही आवाहन यावेळी केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, दिव्यांग बांधव व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अंबाजोगाई शिवसेनेने कार्यक्रमाचे आयोजन अगदी नियोजनबद्ध केले होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.