केज :- सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार व लाचखोरीचा हैदोस माजलेला असतांनाच सरकारकडून मिळणारे वेतन काम अडवण्यासाठी आणि ‘लाच’ काम करण्यासाठी” असेच सुत्र चोहीकडे पाहण्यास मिळत असतानाच केज तालुक्यातील एका तलाठ्याने वारसाचा फेर मंजुर करण्यासाठी चक्क लाचखोरी केलेली असतांना सबळ पुरावे नसल्यामुळे मा.न्यायालयाने सम्धिताची सुटका केली आहे. याबाबत अधिक माहीती अशी की, केज तालुक्यातील सुकळी येथील रामरतन गिरी यांनी वारसाचा फेर मंजुर करण्यासाठी साळेगावचे तलाठी आनिल कुलकर्णी व त्यांचे खासगी राईटर तुळशीराम मुकदम यांच्याशी संपर्क केला आसता त्यांनी लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची ईच्छा नसल्यामुळे रामरतन गिरी यांनी दिनांक १६/३/२०१६ रोजी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला व तलाठी व त्यांचे राईटर वारसाचा फेर मंजुर करण्यासाठी २२०० रुपये मागत आसल्याची सविस्तर तक्रार दाखल केली आसता लाच लुचपत प्रतिबंध खात्याकडुन सापळा टाकण्यात आला. दिनांक १७/३/२०१६ रोजी संबधीत तलाठी व राईटर यांनी लाचेची रक्कम मागितली व ती स्विकारले बाबत केज पोलीस स्टेशन येथे लाच लुचपत कायद्याअंतर्गत गु, र, नं, ७३/२०१६ नुसार कलम ७, ८, १२, १३, १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे सदरील आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले व २०२३ मधे पुढील सुनावणी साठी जिल्हा सत्र न्यायालय केज येथे सदरील प्रकरण वर्ग करण्यात आले आसता अभियोग पक्षाचे साक्षीदार तपासल्यानंतर दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर दिनांक १८/७/२०२४ रोजी मा . जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथम न्यायाधिश कुनाल जाधव साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली”
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.