बीड : बीड विधानसभा निवडणूक संदर्भातील मोठी माहिती हाती आलीअसून, बीड विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बीड विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी अर्ज भरले होते. मात्र आता माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज काढून घेत असल्याचे कळविले आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी काहीवेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज माघारी घेत असल्याचे कळवून, अंतिम वेळेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे कळविले आहे आहे. त्यामुळे आता बीड विधानसभा निवडणुकीच्या वास्तव परिस्थितीत मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट आहे .
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.