देशहित व जिल्ह्य़ाच्या विकासाचा विचार करुन “महायुतीच्या” उमेदवारपंकजाताई मुंडेंना मोठ्या मत्ताधिक्यांने विजयी करा—सौ.रत्नमाला मुंडे.केज:बीड लोकसभेच्या निवडणूक “कुरुक्षेत्रावर” महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे व शरदपवार गटाचे बजरंग सोनवणे अशी दुरंगी लढत दिसत असली तरी,पंकजाताई मुंडे यांचा एकतर्फी विजय निश्चित असल्याचे वातावरण स्पष्ट असतांना अनेक नेते आरोप प्रत्यारोप करुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मतदारांनी उमेदवाराच्या सर्व बाजू तपासून आपल्या देशाचं व आपल्या जिल्ह्याचं हित कशात आहे हे लक्षात घेऊन पंकजा ताईंना लोकसभेत पाठवावे असे अभ्यासपूर्ण अवाहन शिवसेना मुख्यमंत्री गटाच्या महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमाला मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
आपल्या मराठवाड्यामध्ये या पूर्वी चार ताकतवर नेतृत्व होऊन गेली. त्यामध्ये स्व. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे, स्व. प्रमोद महाजन व स्व. विलासराव देशमुख या चारही नेत्यांचा त्यांचा पक्षात एक वेगळा आदर होता. त्यांना जनतेने ताकत दिली व त्यांच्या कर्तुत्वाने त्यांनी जनतेच्या मनावर राज्य केले. स्व. शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले. स्व. लोकनेते मुंडे साहेब विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री राहिले, विलसराव देशमुख मुख्यमंत्री राहिले, महाजन साहेब पंतप्रधान वाचपेयी साहेबांचे सल्लागार होते. या चारही नेत्यांची त्यांच्या पक्षात छाप होती. या चारही नेत्यांनी त्यांच्या कालखंडात जनहिताचे व लोकाभिमुख काम केले. हे चारही नेते आज आपल्यामध्ये नाहीत, याची उणीव मराठवाड्यातील जनतेला भासत आहे. पंकजाताई मंत्री असतांनाचं कर्तृत्व पाहिल्यास व त्यांना जनतेने ताकत दिल्यास मराठवाड्यातुन पुन्हा एक मोठे ताकतवर नेतृत्व उभे राहणार आहे. त्यांच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व व वक्तृत्व या सर्व गोष्टी आहेत. त्यांची स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्याईवर दिल्लीच्या नेतृत्वा पर्यंत थेट सम्बन्ध आहेत. या सम्बन्धाचा फायदा जिल्ह्याला नक्कीच होणार आहे. आणि म्हणूनच पंकजाताई सारख्या नेतृत्वाला ताकत देण्याची हीच खरी वेळ आहे. विरोधी उमेदवाराकडे कुठलाच मुद्दा नसल्यामुळे ही नेते मंडळी संविधान बदलाची भाषा बोलून मतदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अंबाजोगाई च्या सभेत राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे साहेबांनी देखील विरोधी उमेदवाराच्या तुतारीची पिपाणी होणार असल्याचे म्हटले आहे.विरोधक मुस्लिम बंधवांच्या मनात काहीतरी सांगून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. स्व. मुंडे साहेब, पंकजाताई व प्रितमताई यांनी कोणत्याही जाती धर्माला किंवा आरक्षणाला विरोध केलेला नाही. म्हणून अशा प्रकारचा बुद्धिभेद करणाऱ्या लोकांपासून जिल्ह्यातील जनतेने सावध राहून आपला विकास कशात आहे, याचा विचार करुण व आपले मत पंकजाताई च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीनां जाण्यासाठी पंकजाताईं मुंडेंना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे असे आवाहन नांदेड-हिंगोली च्या शिवसेनेच्या म.संपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई मुंडे यांनी केले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.