बीड/प्रतिनिधी: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवार दि. २१ रोजी शहरातील समाज कल्याण समितीच्या सदस्याला सापळा रचून १२ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया सातत्याने सुरु असतानाच आता आणखी एकावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बीड जिल्ह्यात शंकर शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून लाचखोरांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्या आहेत.शिक्षण, महसूल, पोलीस प्रशासन, एसटी महामंडळ, महावितरण, बांधकाम विभाग आणि आता समाज कल्याण समितीतील सदस्य असलेल्या सुरेश प्रभाकर राजहंस (वय-४०) यास लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदार यांची मैत्रीण महिला बाल स्वाधार गृहात दाखल असून तिला तक्रारदार यांनी सोडवण्या करिता दि. १० ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यावरून सदरील मुलीला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यासाठी बालकल्याण समितीचे सदस्य श्री सुरेश राजहंस यांनी स्वतः करिता व समितीतील इतर सदस्य करिता ५० हजारांच्या लाच मागणी करून तडजोडांती १२ हजार रुपये घेण्याचे पंचा समक्ष मान्य करून सापळा कारवाई दरम्यान १२ हजार रुपये लाच रक्कम स्वतः घेताना श्री सुरेश राजहंस यांना बाल कल्याण समितीचे कार्यालयात लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. सध्या शिवाजी नगर, बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस अंमलदार, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.