क्राईम न्युजताज्या घडामोडी

केज तालुक्यातील  एका गावातील दहावीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती!

पाठलाग न्युज/क्राईम प्रतिनिधी:

केज तालुक्यातील  एका गावातील दहावीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती!

केज:जिकडे-तिकडे अनिती आणि अनैतिक प्रकार वाढलेले असतांनाच केज तालुक्यातील एका गावात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली बालिका तिच्या मामेभावाच्या दुष्कृत्यातून चक्क साडेपाच महिण्याची गर्भवती असल्याचा नितीमतेला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आल्याने एकंच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहीती अशी की, केज तालुक्यातील एका गावातील दहावीत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी पोटात दुखत असल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात गेली होती.सदर अल्पवयीन मुलगी ही डाॅक्टरांच्या चेकअप नंतर साडे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा खळबळजनक प्रकार केज तालुक्यात उघडकीस आला असून,सदर पीडित मुलगी ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा अन्य कोणी नसुन तिच्या मामाचा मुलगाच आहे.केज तालुक्यातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने दि.१५ सप्टेंबर रोजी तिची आई तिला केज येतील डॉ. चाळक यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवून गेली होती. तिथे तिची सोनोग्राफी केल्या नंतर समजले की, ती अल्पवयीन मुलगी ही साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. त्या नंतर तिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयत भरती केले. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुन्हा तिची डॉ. स्मिता शेंडगे यांच्या अर्णव डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी केली असता ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा रिपोर्ट घेवून ती अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई सोबत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रसूती वॉर्डात भरती झाली. त्या नंतर तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मागील आठ महिन्या पासून शेजारच्या गावातील तिच्या मामाचा मुलगा हा तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर त्याने बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून दि. १९ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात पीडितेच्या मामाच्या मुला विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बळजबरिने बलात्कार केल्याचा व बाल लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये