ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे.

पाठलाग न्युज:

धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे.

कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती होय. महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार ,राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे. कृषीमुलक बाणा व कृषीवलांसाठीच्या धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री म्हणजे ना.धनंजय मुंडे अशी ओळख त्यांनी आपल्या कर्तृत्वातून निर्माण केली आहे.जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि ‘आपला माणुस’ असा सामान्यांना विश्वास असणाऱ्या या खंबीर नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!! अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि ‘आपला माणुस’ असा सामान्यांना विश्वास असणारे हे खंबीर नेतृत्व आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातलेल्या या नेतृत्वाने राजकीय डावपेचातही अग्रेसर राहून राजकीय पटलावरील आढळ स्थान सिद्ध केले आहे.कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती असल्याचेच म्हणावे लागेल.धनंजय मुंडे यांच्या रूपाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला आणि परळीला दुसरे गोपीनाथराव मुंडे मिळाले आहेत याची खात्रीच पटली. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या शिवाय पानही हलणार नाही अशा प्रकारचे एक धुरंदर नेतृत्व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक प्रकारे सिद्ध केले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही महिन्यांपूर्वी प्रचंड उलथापालथ झाली. या राजकीय रणनीतीमध्ये कोणती समीकरणे कशी जुळली जातील? याचा विचार करून करून सर्वसामान्य माणसाच्या विचार चक्राला ब्रेक लागला होता. अशा क्लिष्ट व अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीतून एक नवीन समीकरण महाराष्ट्र समोर आले.

या राजकीय अमुलाग्र बदलांमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह ज्या मोजक्या नेत्यांची नावे अग्रभागी राहिली त्यातील प्रमुख नाव म्हणजे आपले लाडके नेते कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे हे होय. ना. धनंजय मुंडे नेहमीच सांगत आले की, महाराष्ट्रात जेव्हा केव्हा काही राजकीय घडवायचं असेल किंवा महत्त्वपूर्ण राजकीय वळण मिळणार असेल तर परळीला विचारात घेतल्याशिवाय ते कोणाला शक्य होणार नाही. आणि काही दिवसांपूर्वीच्या राजकीय उलथापालथीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील संघर्षयात्री म्हणून स्वकर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध केलेला सर्व सामान्यांशी पक्की नाळ जोडलेला ‘जननायक’ म्हणजे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आहेत.कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे जीवन म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, जनतेच्या सेवेला समर्पित केलेले मुर्तीमंत उदाहरण होय. जिल्हा परिषदेचा सदस्य ते विरोधी पक्षनेता ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि आता कृषी मंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे. पण या पदांची उंची गाठण्यासाठी चालतांना रस्त्यात अनेक संकटं आली, कधी पाय रक्ताळले, तर कधी मनाला दु:ख आणि वेदनांचा चिखल तुडवत पुढे जावे लागले. अनेकदा सर्व मार्गांनी कोंडीत पकडण्याचे प्रयत्न अनेकांनी अनेक प्रकारे केले. पण कर्तृत्वाची नीव एवढी पक्की की सगळ्या संकटांना आणि राजकीय कुरघोड्यांवर मात करून हे आमचं धिरोदात्त नेतृत्व ‘जब जब भी बिखरा हुं,नयी रफ्तार से निखरा हुं’ याप्रमाणे सिद्ध झाल्याचे उभ्या महाराष्ट्राला दिसुन आले आहे. माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला मदतीची खरी गरज असते. परंतु संपूर्ण समाज जेव्हा संकटात असतो तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाच्या मदतीसाठी पुढे येणारी माणसं ही खऱ्या अर्थाने “हिरो”असतात.

महाराष्ट्रातील लाखोंचे रियल हिरो आमचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे हे आहेत. कर्तृत्व त्याच्याच हातून घडत असतं जे ते पार पाडायची इच्छाशक्ती ठेवतात आणि ते पूर्ण करण्यासाठी कठीण रस्त्यावर चालायचं धाडस करतात! थोडक्यात काय तर राजकीय जीवनात मोठं व्हायचं असेल तर थेट लोकांशी घट्ट नाळ जोडावी लागते. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे नेतृत्व जनतेशी घट्ट नाळ जोडून उभे आहे . लोकाभिमुख काम करणाऱ्या नेतृत्वाला संघर्ष व संकट अटळ असते. पण संघर्षाच्या वाटेवर चालून आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे कौशल्य ज्याला असते तोच लोकमान्य नेता ठरत असतो.राजकीय क्षितिजावरून पाहिले असता देशाच्या व राज्याच्या राजकारणात अगदी थोडकेच नेतृत्व असे दिसतात की ज्यांनी स्वतः अविरत जनतेच्या प्रश्नांसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून आपल्या सततच्या संघर्षातून आपले लोकोपयोगी नेतृत्व उदयास आणले आहे.कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे हे त्यापैकीच एक होय. ज्या व्यक्तीला आपल्याला बसलेल्या चटक्यांची जाण असते,त्याच व्यक्तीला आपल्या मातीला व आपल्या माणसांना बसलेल्या चटक्यांचे भान असते.म्हणूनच अशी एखादी व्यक्ती ती कितीही मोठी झाली तरी त्यांचे लक्ष नेहमी आपली माती व आपल्या माणसांत लागलेले असते. अशाच प्रकारे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभलेले खराखुरे ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री ठरले आहेत.त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कृषी राज्य म्हणून पुढे आले असुन यासाठी देशातील मानाचा पुरस्कारही महाराष्ट्राने पटकावला आहे. ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात विकासाची खरीखुरी गंगा आणण्याचे काम ना.धनंजय मुंडे यांनी करुन दाखवलेले आहे.गोरगरीब, वंचित – उपेक्षितांच्या आयुष्यात उन्नती व विकासाचा रंग भरण्यातच खरे सार्थक आहे हे उद्दिष्ट ठेऊन मुंडें यांनी वाटचाल केलेली आहे. परळी मतदारसंघात विकासाची गंगा प्रवाहित करुन चौफेर व सर्वंकष विकासाचा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न आहे.कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!! लाडक्या नेत्याला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील जनतेची त्यांच्या हातुन सेवा घडो हीच प्रभु वैद्यनाथ चरणी विनम्र प्रार्थना…! –  —‘—-        मोहन साखरे,परळी वैजनाथ.9623373769 .

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये