ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडमावली शिक्षण प्रसारक मंडळ दहिफळ(वड.) संचलित काळेगाव हायस्कुल च्या प्राचार्य पदावर राहूल गदळेंची निवड! निवड खरोखरच रास्त असल्याच्या आभाळभर शुभेच्छात्मक प्रतिक्रिया!!

पाठलाग न्युज/प्रतिनिधि:

वडमावली शिक्षण प्रसारक मंडळ दहिफळ(वड.) संचलित काळेगाव हायस्कुल च्या प्राचार्य पदावर राहूल गदळेंची निवड!

निवड खरोखरच रास्त असल्याच्या आभाळभर शुभेच्छात्मक प्रतिक्रिया!!

केज : केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील शिक्षण संस्थाचालक तथा वारकरी संप्रदायातील नावलौकीक व्यक्त‍िमत्व सखाहारी (तात्या) गदळे यांच्या वढमावली विद्या प्रसारक मंडळ व शिवकृपा विद्या प्रसारक मंडळ दहिफळ वडमाऊली शिक्षण संस्थेची संयुक्त शाखेच्या काळेगाव घाट येथील काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदावर राहूल भैय्या गदळे यांची सर्वानुमते निवड झाली असून, प्रस्तुत निवडीमुळे राहूल भैय्या गदळे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. राहूल भैय्या यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.या बाबत अधिक माहीती अशी की, केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील शिक्षण संस्थाचालक व ज्यांना तात्या म्हणुन ओळखले जाते त्या सखाहारी (तात्या) गदळे यांच्या शिवकृपा विद्या प्रसारक मंडळ दहिफळ वड.या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या व ज्ञान दान करणाऱ्या काळेगाव घाट उच्च माध्यमिक विद्यालयातुन अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहेत. काळेगाव घाट येथील काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामराव मोराळे हे सेवा जेष्ठतेनुसार ३० नोव्हेंबर २३ रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्राचार्य म्हणून संस्थेचे अध्यक्ष सखाहारी (तात्या) गदळे यांनी तातडीने कर्मचारी यांची बैठक घेऊन सर्व कर्माचार्याना विश्वासात घेऊन प्राचार्य पदासाठी राहूल गदळे यांचे नाव सुचवताच सर्व कर्मचारी वर्गानी राहूल भैय्या गदळे यांच्या नावाला उत्स्फूर्तपणे सम्मती दर्शवली. तरुण व कवी मनाच्या तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांबाबत नेहमिच सकारात्मक विचार
असलेल्या राहूल भैय्या गदळे यांचे प्राचार्यपदावर नाव निश्चित करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष सखाहारी (तात्या) गदळे यांनी राहुल भैय्या गदळे यांची प्राचार्य पदी निवड जाहीर करताच या निर्णयाचे टाळ्याच्या गजरात स्वागत करुन आंनद उत्सव साजरा करण्यात आला आहे. बैठकीस उपस्थित कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित प्राचार्य राहूल भैय्या गदळे यांनी पदभार घेताच त्यांचे स्वागत करुन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. राहूल गदळे यांच्या निवडीची माहीती होताच बीड, परळी, केज येथील मित्रमंडळी आणि ससमर्थकांनी मोबाईल वरुन राहूल भैय्या गदळे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.आपल्या शिक्षण संस्थेतीलंच नव्हे तर कुठल्याही “शिक्षक” नावाच्या प्राण्याला सदसदविवेक बुद्धिने सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करणाऱ्या आणि सर्वांच्या संकटसमयी धाऊन जाणाऱ्या, मनमिळाऊ व्यक्त‍िमत्व असलेल्या व्यक्तीला शोभणारे प्राचार्यपद मिळाले असल्याच्या असंख्य प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये