Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

NAC ला गुंगारा देणारी विभागातील 233 आणि बीड जिल्ह्यातील ६४ महाविद्यालये प्रवेशासाठी सस्पेंड. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कार्यवाही.

पाठलाग न्यूज/ प्रतिनिधी :

NAC ला गुंगारा देणारी विभागातील 233 आणि बीड जिल्ह्यातील ६४ महाविद्यालये प्रवेशासाठी सस्पेंड. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कार्यवाही.

छत्रपती संभाजीनगर:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या २३३ महाविद्यालयांची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश क्षमता स्थगित (शून्य) करण्यात आली आहे. त्यामुळे संलग्नीकरण यादीतील ४८४ महाविद्यालयांपैकी २३३ महाविद्यालयांत नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत विद्यापीठाने बड्या महाविद्यालयांनाही दणका दिला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २१ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या ठरावानुसार कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले होते. यासंदर्भात शैक्षणिक विभागासह प्र कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयांनी नॅक, ट्रिपल ए मूल्यांकनाबद्दल अनुत्सुकता दर्शवली. त्यामुळे अधिष्ठाता मंडळाने अशा २३३ महाविद्यालयांच्या प्रवेश बंदीवर शिक्कामोर्तब केले. नॅक मूल्यांकनासाठी मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असलेल्या २३३ महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. महाविद्यालयांचा दर्जा उंचावून उच्च शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत असा आदेश असतानाही मराठवाडा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयाचे संस्था चालक, उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाला न जुमानता हम करे सो कायदा या हिटलरी थाटात वावरून . महाविद्यालयात कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक साधनसुविधा उपलब्ध न करता, विद्यापीठ मान्य प्राचार्य, पात्र अध्यापक नियुक्त न करता खोटे रेकॉर्ड तयार करून, बोगस कागदपत्रांच्या आधारे प्राचार्य, अध्यापक यांच्या नियुक्ती दाखवून उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल करत शैक्षणिक शुल्कावर डल्ला मारत होते. ही बाब उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर संलग्न महाविद्यालयांना व संबंधित मॅनेजमेंट संस्था प्रमुखांना विद्यापीठाद्वारे वेळोवेळी विद्यापीठ मान्य प्राचार्य,पात्र अध्यापक नियुक्त करण्यात यावेत, महाविद्यालयांत शैक्षणिक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे सुचित करण्यात आले होते. परंतु विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संस्था चालक आपल्या संस्थेच्या महाविद्यालयात आपल्या वाहन चालकांना, घरगड्यांना तसेच नातेवाईकांना आपल्या बायका मुलांना प्रभारी प्राचार्य, अध्यापक म्हणून दाखवने, महाविद्यालयात कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक साधनसुविधा उपलब्ध न करता संस्था महाविद्यालयावर बोगस खर्च दाखवून शैक्षणिक शुल्कावर डल्ला मारत होते. शासनाच्या व विद्यापीठ प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार संलग्न महाविद्यालयाचे NAC मुल्यांकन आणि महाविद्यालयाचे शैक्षणिक मुल्यांकन करण्याचा निर्णय विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागाने घेतल्या नुसार संलग्न महाविद्यालयांना वेळोवेळी विद्यापीठाने कळवले ही होते. वेळोवेळी मुदतवाढ ही दिली होती परंतु, केवळ शैक्षणिक शुल्कावर डल्ला मारणाऱ्या मराठवाड्यातील २३३ संस्था चालकांनी आपल्या महाविद्यालयाचे न्याक मुल्यांकन आणि शैक्षणिक मुल्यांकन करण्याकडे दुर्लक्ष केले आणि, निर्धारित मुदतीत न्याक मुल्यांकन संबंधी संलग्न महाविद्यालयांना व संस्था प्रमुखांना याबाबत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर देखील त्यालाही केराची टोपली दाखविणार्या तथाकथित शिक्षण सम्राटांच्या महाविद्यालयांना अखेर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने २०२५-२६या शैक्षणिक वर्षापासून थेट प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय घेऊन न्याक आणि शैक्षणिक मुल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील तब्बल ६४ महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिक्षण सम्राटात एकच खळबळ उडाली आहे. ज्या महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रवेश बंदी घातली आहे अशा महाविद्यालयातील प्रवेशाशी विद्यापीठाचा कोणत्याही प्रकारचा संबध असणार नसल्याचेही विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठ घेणार नाही व समाज कल्याण खात्याद्वारे कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार नाही हे स्पष्ट झाल्यामुळे शिक्षण संस्थाचालकामध्ये एकच खळबळ उडाली आहे.विद्यापीठाच्या आधिपत्याखालील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशीव या जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये विविध कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षण, संगणक, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर, पत्रकारिता अशा शाखांचे अभ्यासक्रम चालवले जात होते. मात्र, नॅक मूल्यांकनाअभावी झिरो इंटेक ही टिप्पणी देऊन प्रवेशास स्थगिती देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील बंद करण्यात आलेल्या कॉलेज ची यादी.
आदित्य कॉलेज ऑफ एम बी ए. बीड, राजर्षी शाहू प्राध्यापक महाविद्यालय मोरेवाडी तालुका अबाजोगाई, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कुसळम तालुका पाटोदा, अपेक्स आयटी कॉलेज माजलगाव,डॉक्टर अब्दुल कलाम कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेज नेकनुर, कॉलेज ऑफ एज्युकेशन फॉर वुमन्स बीड, केशवराज सीनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन सोनेगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीड, श्रीराम अर्टस्& सायन्स कॉलेज केज तालुका केज, भाऊसाहेब पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन केज तालुका केज, स्व रामचंद्र धस दादा कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स आष्टी तालुका आष्टी, संभाजी राजे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स शिरूर कासार,
बीएसपीएम अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई, जनता आटर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज धानोरा तालुका आष्टी, अध्यापक महाविद्यालय केज तालुका केज, आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज बीड, एम एस पी एम कॉलेज ऑफ एज्युकेशन आष्टी तालुका आष्टी, जय किसान महाविद्यालय आपेगाव तालुका अंबाजोगाई, राजमाता जिजाऊ आर्ट अँड सायन्स कॉलेज मादळमोही तालुका गेवराई, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंबाजोगाई, आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पिंपळनेर, ज्ञानवर्धिनी बीसीए अॅड बीसीएस कॉलेज बीड, जवाहरलाल नेहरू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज परळी वैजनाथ, गुरुकुल कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आवटी गुरुकुल नगरी बीड, एन एम एस आर आर्ट सायन्स कॉलेज तेलगाव तालुका माजलगाव, डॉ. विश्वनाथराव कराड कॉलेज ऑफ एज्युकेशन केज, संत भगवान बाबा कॉलेज केज, श्री गुरु पाक्ष शिवाचार्य महाराज आर्ट कॉलेज मानूर तालुका शिरूर आर्ट सायन्स कॉम्प्युटर कॉलेज अमळनेर तालुका पाटोदा, एस एस पी एम एस आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज धानोरा तालुका आष्टी. राजीव गांधी आर्ट सायन्स कॉलेज रायमोह तालुका शिरूर गुरुकुल कॉलेज ऑफ एज्युकेशन बीड, महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मशन टेक्सॉलॉजी चौसाळा तालुका बीड, संभाजी राजे कॉलेज ऑफ लायब्ररी अँड मॅनेजमेंट सायन्स बीड, तुलसी कॉलेज ऑफ कॉम्प्युटा सायन्स अँड आयटी बीड, छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट बीड गोरमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबाजोगाई आदित्य कॉलेज ऑफ एज्युकेशन बीड, श्री मोरेश्वर कॉलेज गंगामसला तालुका माजलगाव जिल्हा बीड, स्वामी विवेकानंद कॉलेज परळी वैजनाथ.
श्री तांबवेश्वर कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी केज जिल्हा बीड, स्व भगवानराव केदार बीएड कॉलेज वारणी तालुका शिरूर, आर्ट अँड सायन्स कॉलेज आष्टी जिल्ला बीड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यापक महाविद्यालय शिवाजीनगर गढ़ी तालुका गेवराई, आर्ट अँड सायन्स कॉलेज चकलांबा तालुका गेवराई, छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ लेबर अँड इन्फर्मिशन सायन्स बीड, संत भगवान बाबा आर्ट अँड सायन्स कॉलेज घाटशीळ पारगाव तालुका शिरून, शंकराव गुड़े ग्रामीण आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज धर्मपुरी तालुका परळी जीवनदीप आर्ट सायन्स अँड कॉम्प्युटर सायन्स कॉलेज पिंपळनेर . वसंतराव काळे कॉलेज ऑफ जनरल एजेंट अँड कॉम्प्युटर सायन्स बीड, शाम गदळे आर्ट कॉलेज दहिफळ (वडमाऊली) तालुका केज, त्वरितादेवी आर्ट अँड सायन्स कॉलेज तलवाडा ता गेवराई, नालंदा कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स आष्टी, स्व रामचंद्र दादा धस सीनियर कॉलेज एज्युकेशन आष्टी, पद्मश्री आप्पासाहेब पवार सर कॉलेज बर्दापूर तालुका अंबाजोगाई कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च आहे, मराठवाडा कॉलेज ऑफ इन्फॉर्मिशन टेक्नॉलॉजी बीड, गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी माजलगाव, किशोरी कॉलेज ऑफ एमबीए बीड, सुरज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बीड, मिठूलालजी सारडा एमबीए कॉलेज बीड आर्ट अँड साक्स कॉलेज मारफळा जीवन शिक्षण सायन्स कॉलेज केज जिल्हा बीड या महाविद्यालयाचा समावेश आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये