बीड /जिमाका : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यम कक्षास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष अविनाश पाठक यांनी आज भेट दिली. तसेच कक्षामध्ये सुरू असलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांच्या कामकाजांचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अर्पिता ठुबे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, स्वीपचे नोडल अधिकारी ओमकार देशमुख, प्र.जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके, तहसीलदार अविनाश शिंगटे, माध्यम कक्षातील सहायक कक्ष प्रमुख् राजश्री आचार्य, इंग्रजीच्या प्रोफेसर डॉ. संगीता ससाणे, हिंदीचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र सोनवणे, उर्दूचे अनुवादक शेख मोहम्मद काजिमोद्दीन यांच्यासह माध्यम कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.