ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
महाराष्ट्रात पुन्हा “महायुतीचं” सरकार! महाविकास आघाडीला मोठा “हबाडा “!! एन्डोएशियन न्यूज सर्विसेस चा सर्वे!!! .
पाठलाग न्यूज / वृत्तसंस्था :

महाराष्ट्रात पुन्हा “महायुतीचं” सरकार!
‘महाविकास’आघाडीला मोठा “हबाडा “!!
एन्डोएशियन न्यूज सर्विसेस चा सर्वे!!!
वृत्तसंस्था : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीने आता वेगळा रंग परिधान केला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच एन्डोएशियन न्यूज सर्विसेस या जागतिक न्यूज संस्थेने मतदान पूर्व सर्वेक्षणाचा अंदाज जाहीर करत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान प्रस्तुत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडो एशियन न्यूज सर्विसेस च्या सर्वेक्षणात भाजपला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि ठाणे-कोकण भागात प्रचंड जनसमर्थन मिळणार असल्याचं समोर आलं आहे. भाजपला पश्चिम महाराष्ट्रात ४८ टक्के, विदर्भात ४८ टक्के आणि ठाणे-कोकणात ५२ टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . त्याचवेळी, महाविकास आघाडीला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासारख्या भागात अनुक्रमे ४७ टक्के आणि ४४ टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडोएशियन न्यूज संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वाधिक पसंतीचे मुख्यमंत्री राहिले आहेत. इंडो एशियन न्यूज च्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रातील नागरिकांना जेव्हा विचारण्यात आले की, मुख्यमंत्रीपदासाठी तुमची निवड कोणाला आहे? तेव्हा ४० टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सहमती दर्शवली. तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना २१ टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना १९ टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. ६५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी शिंदे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे, त्यापैकी ४२ टक्के लोकांनी ते खूप चांगले आहे आणि २७ टक्के लोकांनी काम सरासरी चांगलं असल्याचं सांगितलं आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या खराब कामगिरीच्या संभाव्य कारणांबद्दल विचारले असता, सुमारे ४८ टक्के लोकांनी त्याचं कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात झालेल्या पक्षफुटीमुळे असल्याचं सांगितलं आहे. एन्डोएशियन न्यूज सर्विसेस संस्थेचे हे सर्वेक्षण १० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे . सर्वेक्षणात राज्यातील १,०९,६२८ लोकांची मते घेण्यात आली आहेत. यामध्ये ५७ हजारांहून अधिक पुरुष, २८ हजार महिला आणि २४ हजार तरुणांच्या मतांचा समावेश आहे. एनडोएशन न्यूज सर्विसेस या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी महायुती आघाडीला १४५-१६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १०६-१२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. मतांच्या संख्येत सत्ताधारी महायुती आपल्या विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीला मागे टाकण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील युतीला ४७ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर आघाडीला ४१ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात, इतर मित्रपक्ष किंवा अपक्षांना १२ टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे. बीड जिल्ह्यातील केज मतदार संघ.
