क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केज तालुक्यातील तांबवा येथील गणेश माध्यमिक विद्यालयातील संस्थाचालकाच्या लाचखोरी प्रकरणी केजच्या जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल. शिक्षकाच्या सेवानिवृत्ती प्रस्ताव आदेशाच्या  मा.न्यायालयाच्या “अवमान” प्रकरणी संभाजीनगर खंडपीठात अवमान याचिका दाखल .

पाठलाग न्युज/प्रतिनिधि:

केज तालुक्यातील तांबवा येथील गणेश माध्यमिक विद्यालयातील संस्थाचालकाच्या लाचखोरी प्रकरणी केजच्या जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल.

शिक्षकाच्या सेवानिवृत्ती प्रस्ताव आदेशाच्या  मा.न्यायालयाच्या “अवमान” प्रकरणी संभाजीनगर खंडपीठात अवमान याचिका दाखल

बीड: शिक्षणक्षेत्रात काळा बाजार ,गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचा हैदोस माजला असतांनाच शिक्षण संस्थाचालक आणि प्रशासन यांच्या संगणमताने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांची विविध मार्गाने सर्वच बाजुने लयलूट केली जात असतांनाच केज तालुक्यातील गणेश माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवण्यासाठी १२लाख रुपये नगदी व पेन्शन लाभातला अर्धा हिस्सा मागणी करणारे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वागूर टाकून रंगेहात पकडलेले संस्था सचिव, शाळेचा मुख्याध्यापक व त्यांना मदत करणारा शेजारील दुसर्‍या संस्थेचा मुख्याध्यापक तथा संस्था अध्यक्ष व मध्यस्थी करणारा  एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता यांचे विरुद्ध केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयात बीड च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साडे चारशे पानांचे “आरोप-पत्र” दाखल केले असून, वरिष्ठ आधिकार्यांचा तर नाहीच पंरतु,मा.उच्च न्यायालयाचाही आदेश न मानणाऱ्या प्रस्तुत  संस्थेचा  सचिव, प्रभारी मुख्याध्यापक व माध्यमिक  विभागाचे शिक्षणाधिकारी यांनाही मा.न्यायालयामार्फत न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

या बाबतचा थोडक्यात वृत्तांत असा की ,केज तालुक्यातील गणेश माध्यमिक विद्यालयातील कार्यरत शिक्षक शिवदास मुंडे हे नियत वयोमानानुसार दि.५जुन २०२१ रोजी रितसर सेवानिवृत्त झाले.संस्थेने त्यांना सन्मानपूर्वक कार्यमुक्त केले परंतु,सेवानिवृत्तीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी संस्थाचालकाने १५ लाखांची मागणी केली.तडजोडीत १२लाखांचा ठराव करून पेन्शन लाभतला अर्धा हिस्सा डिमांड मध्ये घातला. संस्थाचालकाला जमीनी विकून सतत डोनेशन देत आलेल्या अन्यायग्रस्त शिक्षक शिवदास मुंडे यांनी बीड च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर संपुर्ण डिमांड पैकी दिड लाखांचा पहीला हप्ता स्वीकारतांना संस्थाचालक दादू उर्फ अशोक हरिभाऊ चाटे,मुख्याध्यापक अनंत बाबुराव हंगे,तांबवा येथील शेजारील संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक उद्धव कराड व सम्धित शिक्षकाडून सर्वप्रकारची वसुली करुन देण्याचे काॅन्ट्रॅक्ट घेतलेले भाजपाचे नेते दत्तात्रय धस यांचे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.न.१००/२०२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शिक्षण क्षेत्रातल्या लाचखोरी चे गणेश माध्यमिक विद्यालय हे एक माॅडेल उदाहरण समोर घेऊन बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस उपाधिक्षक शंकर शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणात कसून तपास केला.संपुर्ण बारकावे व लॅकूना तपासून अखेर सविस्तर व कुठेही कमतरता राहणार नाही याची दखल घेऊन केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात साडेचारशे पानांचे आरोप पत्र दाखल केले आहे.

या प्रकरणात अत्याधुनिक साधणांचा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स सिम,मोबाईल्स व सांऊड कन्ट्रोल चा वापर करण्यात आल्यामुळे,आता पर्यंतच्या लाचलुचपत च्या प्रकरणात आणि प्रस्तुत प्रकरणात फरक असल्याने शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे हे प्रकरण असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संस्थेने मा.उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे दाखल केलेल्या याचिकेत देखील सम्धित शिक्षकाचा पेन्शन प्रस्ताव दाखल करुन पेन्शन चालू करण्याचे आदेश दिलेले असतांना व शासनाने वस्तुस्थितीदर्शक अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश असतांना सुद्धा माध्यमिक चे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,संस्था सचिव अशोक हरिभाऊ चाटे व चार्ज सांभाळणारे मुख्याध्यापक रमाकांत अर्विकर यांना अवमान प्रकरणी उच्च न्यायालयाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये