बीड —प्रशासनात लाचखोरीचे थैमान माजलेले असतांनाच लाच खाण्यात हातखंडा असलेला कार्यरत मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी , मुरुम व दगड काढण्याच्या खदाणीचे अवैधरीत्या केलेले खोदकाम कमी दाखवण्यासाठी दोन लाखांची लाच मागितली आणि ही लाच मागणाऱ्या महसुल चा लाचखोर मंडळ अधिकारी सचिन सानप याला बीड च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर चतुर्भुज केल्याने महसूल प्रशासनात एकंच खळबळ उडाली आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांचे नातेवाईक व इतरांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात मुरुम उत्खनना संदर्भात गुन्हा दाखल झाल्याने मोची पिंपळगाव येथील गट न.४९ मधील वास्तव परिस्थितीचा पंचनामा मंडळाधिकारी सचिन सानप याने केला होता. प्रस्तुत पंचनाम्यात १००० ब्रास ऐवजी ५०० ब्रास उत्खनन दाखवण्यासाठी म्हणजेच तक्रारदाराला लाभ मिळवून देण्यासाठी सचिन सानप याने पंचा समक्ष २लाख रुपयांची लाच मागितली होती.तडजोडी अंती दीड लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले.यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारतांना बुधवार दिनांक २१/८/२०२४ दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सचिन सानप ला रंगेहात पकडले जमिनीचे बोगस फेरफार करणे असो की वाळू तस्करांशी संधान बांधणे असो की अवैध उत्खनन असो प्रत्येक ठिकाणी स्वतःची तुंबडी भरायची. यावर पांघरून घालण्यासाठी वरिष्ठांची हुजरेगिरी करायची वेळप्रसंगी खाल्लेल्या मलिध्यातला हिस्सा त्यांना देऊन लाचखोरीवर पांघरून घालायचं एवढाच धंदा सचिन सानप याने सुरू केलेला होता.यातून सर्वसामान्य नागरिक मात्र पिळवटून निघत होता.अवैधरीत्या केल्या गेलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी सानपने दोन लाखांची लाच मागितली; यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना मंडळ अधिकारी सचिन सानप हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहात सापडला. बीड तहसील कार्यालयाबाहेरील “श्री हाॅटेल’ या हॉटेलमध्ये एसीबीने ही कारवाई केली. ही खळबळजनक कारवाई एसीबी चे पोलीस अधीक्षक संदीप अटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकूंद आघाव, यांच्या सूचनेनुसार सध्या बीड जिल्ह्यात लाचखोरांचा ‘गर्दनकाळ’ म्हणून ओळखले जाणारे एसीबी चे उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सापळाप्रमुख तथा पोलीस निरीक्षक युनूस शेख, पो.आ.सुरेश सांगळे,श्रीराम गिराम ,हनुमान गोऱ्हे,सुदर्शन निकाळजे, भारत गरदे,अविनाश गवळी,राजेश नेहरकर,संतोष राठोड, अमोल बरसाते, अबांदास पुरी,गणेश म्हेत्रे यांनी ही कारवाई पार पडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाचखोर मंडळाधिकारी सचिन सानप विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,सानप गजाआड आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.