भोगवटादार प्रमाणपत्रासाठी 3000 रुपयांची मागणी करणाऱ्या लाचखोर तलाठ्यास दोन हजार रुपये मोजताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
बीड: समाजात लोकसेवक नावाच्या भ्रष्ट आणि लाचखोर कुप्रवर्तींचा जिकडेतिकडे हैदोस माजला असून, सर्वसामान्य माणसाचे कुठलेच काम दिल्या घेतल्याशिवाय होत नसल्यामुळे संपूर्ण समाज व्यवस्थाच कोलमडून गेली असतानाच, बीड तालुक्यातील एका सज्जाच्या तलाठ्याने केवळ भोगवटादार प्रमाणपत्र देण्यासाठी केवळ दोन हजार रुपयांची लाच घेतली आणि लाच लुपत प्रतिबंधक विभागाकडून ऐन दिवाळीच्या सणातच पोलिसांच्या स्वाधीन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की. तलाठी मदन लिंबाजी वनवे वय 35 वर्ष रा. गायकवाड यांचे घर, पंढरी, धानोरा रोड बीड असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या मित्राने मौजे तळेगाव येथे गट क्रमांक 192 मधील मालमत्ता क्रमांक4309 चे मुख्त्यारपत्र तयार करून दिले होते. सदर प्लॉटची ग्रामीण गुंठेवारी करण्यासाठी भोगवटादार प्रमाणपत्राची गरज होती. भोगवटादार प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठी लोकसेवक मदन वनवे याने लाचेची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार एसीबी कडे करण्यात आल्यानंतर पंचा समक्ष तलाठी वनवे याने तीन हजार रुपयांची डिमांड केली असल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले. मात्र तडजोडी अंती दोन हजार रुपये घेण्यास तलाठी मदन वनवे तयार झाला. दरम्यान लाचे चे पैसे स्वीकारताना मदन वनवे यास त्याच्या खाजगी कार्यालयातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई बीड लाचलुतपत प्रतिबंधक विभागाचे कर्तव्यदक्ष उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेख युनूस, किरण बगाटे, पोलीस अंमलदार, भरत गारदे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी. गणेश मेहेत्रे यांनी केली. या कार्यवाहीमुळे महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.