विकासाचे स्वप्न साकार करू या.एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा !!!सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.‘विकासाचे स्वप्न साकार करू या. एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा.
मुंबई : “महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण महामहाराष्ट्राच्याखवाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया”, असा निर्धार व्यक्त करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तमाम जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दीपोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.आपले सणदेखील तोच संदेश देतात. म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूया, प्रदूषण टाळूया. सणांचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा सर्वांची आहे, हे लक्षात ठेवून सण साजरा करूया. शिवछत्रपतींचा, जिजाऊ माँसाहेब यांचा हा महाराष्ट्र केवळ देशातील अन्य राज्यांसाठी नव्हे, तर जगाने दखल घ्यावी अशी गौरवपूर्ण वाटचाल करीत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.