ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवरामपुरी पतसंस्थेची दहावी_शाखा_वडवणीत_कार्यन्वित! जि.प.चे मा.उपाध्यक्ष विक्रम बप्पांचा बॅकिंग क्षेत्रातला नेत्रदीपक प्रयोग पुन्हा संपन्नपुर्वक यशस्वी!!!
पाठलाग न्युज/प्रतिनिधि:


वडवणी/प्रतिनिधि: अलीकडे बँकींग क्षेत्रात अविश्वास व जीवघेणे स्पर्धात्मक वातावरण असतांनासुद्धा बीड जि.प.चे माजी.अध्यक्ष विक्रम बप्पा मुंंडे यांचे मार्गदर्शनाखाली विडा जि.प.चे सदस्य तथा कृष्णा को.अप.अर्बन बँकेचे चेअरमण विजयकांत मुंडे यांनी शिवरामपुरी पतसंस्थेची वडवणी येथे १० वी शाखा यशस्वीपणे उघडून सहकार व बँकिंग क्षेत्रात अगळा-वेगळा उपक्रम केला असल्याच्या असंख्य प्रतिक्रिया उमटत आहेत. या बाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, बीड जि.प.चे मा. उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे संस्थापक असलेल्या केज तालुक्यातील विडा येथील शिवरामपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या १० व्या शाखेचा शुभारंभ वडवणी येथे काल गुरूवार दि-१/२/२०२४ रोजी दुपारी ११ वाजता माजी आ.केशव (दादा) आंधळे व बीड जिल्हा परिषेदेचे बांधकाम सभापती जयसिंग (भैय्या) सोळुंखे यांच्या शुभहस्ते तर बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

Lorem ipsum dolor sit amet, consectetur.