“मूकनायक ” अन्याय-अत्याचारग्रस्तांचा बुलंद आवाज!! पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे प्रतिपादन.
केज पत्रकार व केज तालुका मराठी पत्रकार परिषद यांचे संयुक्त विद्यमाने मुकनायक दिन साजरा.केज / प्रतिनिधी: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मूकनायक या मराठी पाक्षिकातून गुलामगिरी, अन्याय -अत्याचार आणि शोषणाचे समर्थन बनलेल्या त्या वेळेच्या व्यवस्थेला अव्हान दिले.एवढेच नाही तर समतावादी आणि न्यायवादाची परिभाषा मूकनायकाच्या माध्यमातून सामान्यांच्या मनात रुजविली; त्यामुळेच मूकनायक हे त्याकाळी तळागाळातील उपेक्षितांचा आणि ग्रामीण
जनतेचा बुलंद आवाज बनले.मूकनायक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यानी.लिहलेल्या घटनेमौळेच आज आपला देश एकसंध असल्याचे प्रतिपादन केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी. केज तालुका पत्रकार मित्र परिवाराने आयोजित केलेल्या मुकनायक दिनानिमित्त कार्यक्रमातून केले.
केज येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवार (दि.३१) रोजी मराठी पत्रकार परिषद व केज तालुका पत्रकार मित्र परिवार यांचे संयुक्त विध्यमाने मूकनायक दिनाचा १०४ वा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून प्रा.हनुमंत भोसले,जेष्ठ पत्रकार शिवदास मुंडे,धनंजय कुलकर्णी व आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव सोनवणे उपस्थित होते. विचार मंचावर प्रा.हनुमंत भोसले, दै वादळ वार्ता चे संपादक अजय भांगे,मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष विजय आरकडे व गौतम बचुटे यांनी आपले विचार मांडले. या वेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाला पत्रकार रमेश गुळभिले,सुहास चिद्रवार,सन्नि शेख,संतोष गालफाडे,एक्बाल शेख,महादेव गायकवाड, संपादक बाबा मस्के,श्रीराम तांदळे,अजिम इनामदार, बाळासाहेब जाधव, कळसकर,अक्षय गित्ते उपस्थित होते.उपस्थितांचे आभार पत्रकार गौतम बचुटे यांनी मानले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.